Maharashtra Politics: सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांनी भरला राज्यसभा उमेदवारीचा अर्ज 
महाराष्ट्र

Sunetra Pawar News: सस्पेन्स संपला! सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी; राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra Politics Latest News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

Gangappa Pujari

रुपाली बडवे| मुंबई, ता. १३ जून २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबतचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

बारामती लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार अशी चर्चा सुरू होती. त्याचबरोबर राज्यसभेच्या जागेसाठी सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांचेही नाव आघाडीवर होते. अखेर या सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी विधानभवनात राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, सुनिल तटकरे आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उत्सुक असलेले मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबतची नाराजीही त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. राज्यसभेसाठी मी इच्छुक होतो. मात्र प्रत्येकवेळी मनासारखं होत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

BMC अधिकारी ACB च्या जाळ्यात, लाच घेताना तिघांना रंगेहाथ पकडले

Silver Rate Today: ऐन दिवाळीत महागाईचा भडका! चांदीचे दर २ लाखांच्या पार; वाचा तुमच्या शहरातील भाव

Ratnagiri Tourism : सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलाय ऐतिहासिक किल्ला, परफेक्ट लोकेशन जाणून घ्या

Bigg Boss 19-Tanya Mittal : तान्या मित्तलवर फसवणुकीचा आरोप, अटक होणार? वाचा नेमकं प्रकरण काय

SCROLL FOR NEXT