Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदे गटाकडून भाजपला 'दे धक्का', बड्या नेत्याचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Political News : भारतीय जनता पक्षातील नेते मनोज राणे यांनी पक्षातून बाहेर पडत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • भाजप नेते मनोज राणे यांनी पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केला.

  • या पक्षप्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला.

  • मीरा-भाईंदर परिसरात शिंदे गटाची ताकद वाढली.

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असे संकेत आहेत. राज्यात नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापती यांच्या आरक्षणाचा जीआर जाहीर झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आगामी निवडणुकींसंबंधित घोषणा केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला शिंदे गटाकडून धक्का दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मंत्री नितेश राणे यांचे खंदे कार्यकर्ते अशी मनोज राणे यांची ओळख आहे. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने भाजपला धक्का बसला असे मानले जात आहे.

मनोज राणे यांनी त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे मीरा-भाईंदर आणि आसपासच्या परिसरात शिंदे गटाची शक्ती वाढली आहे. शिंदे गटातील नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज राणे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर इतर पक्षांमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नेत्यांनी भाजपमधून इतर घटक पक्षांमध्ये प्रवेश करायला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे. निवडणुका होईपर्यंत हे इनकमिंग आणि आउटगोईंग प्रकरण सुरु राहणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Cinema : मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा परवडत नाही, शंभर रुपयात तिकीट उपलब्ध करून द्या; अभिनेत्याची मोठी मागणी

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेने पुन्हा गेवराईच्या शिंगरवाडीत थोपटले दंड.

Kangana Ranaut : कंगना रनौतला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, नेमकं काय आहे प्रकरण?

Sushila Karki: नेपाळची संसद बरखास्त; सुशीला कार्की होणार हंगामी पंतप्रधान

Uddhav Thackeray: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक सामना? उद्धव ठाकरेंचा संताप, जिल्हाप्रमुखांना दिल्या 'या' सूचना|VIDEO

SCROLL FOR NEXT