Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का? बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत, आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली होती.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, प्रतिनिधी

Maharashtra Politics:

नांदेड शासकीय रुग्णालयातील रुग्णांंच्या मृत्यूनंतर राज्याचे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. ट्रीपल इंजिन सरकार असूनही राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत, आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

"उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा,ऑ क्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मशगूल होतात... अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

तसेच "उद्धवजी, तुम्ही तर मृतदेहासाठी वापरायच्या बॅगध्येही कट कमिशन सोडलं नव्हतं. मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का?.. असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.

यामध्ये पुढे चंद्रशेखर बावनकुळे यांनी "मुख्यमंत्री नागपुरात (Nagpur) का गेले नाहीत? नांदेडला का गेले नाहीत? मुख्यमंत्री घरात का बसले? असं कोण विचारतंय तर ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर सरकार चालवलं ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असा खोचक टोलाही लगावला.

उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तुम्ही नांदेडला (Nanded) जाणार का? तर त्यावर ते म्हणतात मी कशाला जाऊ? माझा पक्ष चोरलाय, माझं पद गेलं. म्हणजे पदावर असताना घरी बसायचं. पद गेल्यावरही घरात बसून पत्रकार परिषद घ्यायची आणि स्वतः काही करायचं नाही हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार! अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT