Thackeray Group Former MLA Anil Kadam Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदे गटानंतर भाजपचा ठाकरे गटाला दे धक्का; नाशिकमधला मोठा नेता सोडणार उद्धव ठाकरेंची साथ

Thackeray Group Former MLA Anil Kadam: नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. माजी आमदार ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

शिंदे गटाच्या शिवसेनेनंतर भाजप उद्धव ठाकरेंना धक्का देणार आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. येथील ठाकरे गटाचा मोठा नेता पक्षाची साथ सोडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात ऑउटगोइंग सुरू आहे. जागोजागी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. आता नाशिकमध्ये शिंदे गटानंतर भाजप ठाकरे गटाला धक्का देणार आहे.

येथील माजी आमदार हाती कमळ घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. माजी आमदार अनिल कदम लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मागील २ निवडणुकीत अनिल कदम यांनी सलग विजय मिळवला होता. इतका ताकदवान नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याने ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.

अनिल कदम हे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला फटका बसला. २०१९ च्या निवडणुकीत ५६ जागा निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंना २०२४ च्या निवडणुकीत केवळ २० जागांवर समाधान मानावं लागलं. निवडणुकीच्या निकालापासून ठाकरे गटाला गळती लागलीय. अनेक माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडलीय.

अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के देत आहेत. निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांचा प्रवेश करून घेत भाजपही ठाकरे गटाला धक्का देणार आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम हे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कोण आहेत अनिल कदम?

अनिल कदम हे २००९ आणि २०१४ साली निफाड विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखले जातं. २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी बंड केला तेव्हा त्यांनी ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं. निफाड तालुक्यात अनिल कदम यांचा जनसंपर्क मोठा आहे. सुशिक्षित नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. परंतु अनिल कदम यांना त्यांच्या घरातूनच आव्हान आहे.

त्यांचे चुलत बंधू यतीन कदम हे त्यांचे विरोधक मानले जातात. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत अनिल कदम यांचा पराभव झालाय. अनिल कदम यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी झाले. २००९ साली शिवसेनेच्या अनिल कदमांना ९० हजार ६५ मते तर राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांना ५६ हजार ९२० मते मिळाली होती. २०१४ मध्येही कदम विरुद्ध बनकर सामना झाला. त्यात अनिल कदमांना ७८ हजार १८६ मते तर दिलीप बनकर यांना ७४ हजार २६५ मते मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT