Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मुंबईत शिंदे गटाला मोठा हादरा, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Political News : मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपने एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. मुंबईतील शिंदे गटातील प्रमुख शाखाप्रमुखाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • मुंबईत भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंना धक्का दिला आहे.

  • आमदार प्रकाश सुर्वेंचे निकटवर्तीय आणि शाखा प्रमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

  • प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

Maharashtra : विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. महायुती, महाविकासआघाडीसह इतर पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची प्रकरणे समोर येत आहेत. निवडणुकीपूर्वी शिंदे गटातील नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे गटाला हादरा बसल्याचे म्हटले जात आहे.

शिंदे गटाला मुंबईतील मागाठाणे येथे मोठा धक्का बसला आहे. सुभाष येरुणकर हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय आहेत. ते वॉर्ड क्रमांक ११ चे शिवसेना शाखाप्रमुख आहेत. आज (१० ऑगस्ट) सुभाष येरुणकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे सुभाष येरुणकर हे मागील २० वर्षांपासून शिवसेना पक्षात होते. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये सुभाष येरुणकर यांचा पक्षप्रवेश झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे.

शिंदेसेनेतील सोलापूरमधील नेते शिवाजी सावंत यांनी शिंदे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा देत पक्षाची साथ सोडली. यामध्ये जिल्हा समन्वयक, उपजिल्हाप्रमुख यांसारख्या विविध तालुक्यांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT