Ajit Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: निवडणुकीचे बिगुल वाजताच अजित पवारांचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह १५ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

NCP Ajit Pawar Group: सांगलीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. बड्या नेत्यांसह १५ जण अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

Priya More

Summary -

  • महापालिका निवडणुकीआधी सांगलीत मोठी राजकीय घडामोड

  • महायुतीमध्ये फोडाफोडी सुरूच

  • चार पक्षांतील बडे नेते अजित पवार गटाच्या संपर्कात

  • भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते अजित पवार गटाच्या वाटेवर

महायुतीमध्ये फोडाफोडीचे सत्र सुरूच आहे. सांगलीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि जनसुराज्य पक्षाला मोठा धक्का दिला आहे. चारही पक्षातील बड्या नेत्यांसह माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहे. सांगलीमधील माजी नगरसेवकांसह १० ते १५ जणांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेतली. हे सर्वजण १९ किंवा २० डिसेंबरला मिरजमध्ये अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस, भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्षातील ५ महत्त्वाच्या माजी नगरसेवकासह इच्छुक असणाऱ्या १५ जणांनी सोमवारी रात्री उशिरा पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा झालेली आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड अशा तीन शहरांची मिळून असलेल्या महापालिकेत मिरजेच्या वाट्याला २७ जागा आहेत. अजित पवारांची भेट घेतलेल्यां मध्ये मिरजेचे माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह त्यांचे पुत्र काँग्रेसचे माजी नगरसेवक करण जामदार, भाजपचे शिवाजी दुर्वे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, आरिफ चौधरी, जनसुराज्य पक्षाचे माजी नगरसेवक आनंदा देवमाने यांच्यासह चंद्रकांत हुलवान, रमजान सतारमेकर, अंकुश कोळेकर आणि संतोष कोळी यांनी भेट घेतली. त्यांच्यासह आणखी १० ते १५ जणांनी देखील अजित पवारांची भेट घेतली.

दरम्यान या सर्वांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाल्यास काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. महायुतीमध्ये फोडाफोडी बंद असताना देखील घटक पक्षांमध्ये पक्षांतर सुरूच आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार १९ किंवा २० तारखेला मिरज दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी या सर्वांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सांगलीमध्ये अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT