अरुण गुजराती यांची चांगली संघटनात्मक पकड अजित पवार गटाच्या उपयोगी पडेल.
गुजराती हे जवळपास ४० वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत होते.
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अरुण गुजराती यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय पक्षांतरांचा हंगाम सुरू झालाय. महायुती असो की महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑऊटगोईंग आणि इनकमिंग सुरू आहे. आता अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना जबर धक्का देत त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला आपल्या गोटात ओढून आणलंय.
माजी विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अरुण गुजराती यांनी घड्याळ हाती बांधत तुतारीला रामराम ठोकलाय. विशेष म्हणजे अरूण गुजराती हे शरद पवार यांचे निष्ठावंत शिलेदार मानले जातात. गुजराती हे जवळपास ४० वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत होते.
आज मात्र त्यांनी तुतारीला दूर सारत हाती घड्याळ बांधलंय.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात अरुण गुजराती अधिकृतपणे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत . अरुण गुजराती यांनी काँग्रेस पक्षातून शरद पवारांसोबत राजकारणाची सुरुवात केलीय. अरुण गुजराती यांनी मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलंय. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी दोन कार्यकाळ पूर्ण केले होता.
मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे अरुण गुजराती यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अजित पवार गटात जात असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. “शरद पवार साहेबांसोबत आनंदाचा काळ गेला. ज्यांनी मला मोठं केले ते शरद पवार आणि ज्यांनी मला पुढे आणले ते कार्यकर्ते. या दोघांच्या मध्ये मी सँडविच झालो होतो. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं गुजराती म्हणाले. ”
फुटीमुळे समर्थक विभागले गेले
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर चोपड्यात अरुण गुजराती यांच्या समर्थकांमध्ये मोठी फूट पडली. काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेले तर काही इतर पक्षात गेले. जर अरुण गुजराती हे अजित पवार यांच्यासोबत गेले तर त्यांच्यासोबत राहू नाहीतर आम्ही वेगळा मार्ग निवडू असा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतल्यानं अरुण गुजराती यांनी अजित पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला.
या भागात अरुण गुजराती यांची चांगली संघटनात्मक पकड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार गट कमकुवत झाला होता. आता गुजराती यांच्या प्रवेशामुळे अजित पवार गटाला स्थानिक स्तरावर मोठा बळकटी मिळणेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.