Sunetra Pawar during a party meeting amid discussions over the NCP national president post. saam tv
महाराष्ट्र

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा; अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरला?

NCP National President : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा पहिला ठराव पुण्यातून एकमताने मंजूर झाला आहे. अध्यक्ष निवड प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झालीय.

Bharat Jadhav

  • अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर चर्चा.

  • सुनेत्रा पवार यांच्या नावाचा ठराव पुण्यात एकमताने मंजूर.

  • फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू होणार.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, अशी चर्चा रंगली होती. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरल्याची माहिती मिळालीय. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा पहिला ठराव पुण्यातून एकमताने मंजूर झाला आहे. अध्यक्ष निवड प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झालीय.

राष्ट्रवादीच्या घटनेतील संबंधित तरतुदींनुसार राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाले तर पक्षाच्या अधिकृत यंत्रणेला योग्य ठरावाद्वारे नवीन अध्यक्ष निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची या पदावर निवड करावी, असा पहिला ठराव पुण्यात मंजूर करण्यात आला आहे. पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीत हा ठराव करण्यात आलाय. असे वृत्त सरकारनामा वृत्तसंस्थेनं दिलंय. दरम्यान पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला.

हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्यात आलाय. महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते ॲड. नीलेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नावे पुढे आल्याने जोरदार चर्चा सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘नेहरूंचा उदो-उदो करा, पण बाबासाहेबांचे अवमूल्यन करू नका’; भाई गिरकरांचा अभिजीत दिपकेंवर निशाणा

Black and White: ‘जैनांची नगरी’ म्हणालो, पण...; नरेंद्र मेहतांचं Exclusive मुलाखतीत स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लान, १०० विद्यामान आमदारांचे पत्ते कट होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Boiler Explosion : कारखान्यात अचानक बॉयलर फुटला; ५ जणांचा जागीच मृत्यू, अनेक कामगार अडकल्याची भीती?

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये कधी जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT