Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का; कट्टर शिवसैनिक आज शिंदे गटात प्रवेश करणार

Dharashiv Shivsena News : धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

Satish Daud

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

विधानसभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. आमदार कैलास पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. लवकरच शिवाजी कापसे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

त्यामुळे या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे. दुसरीकडे निष्ठावंत कार्यकर्त्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे दोन शिलेदार आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहे.

राज्यातील लोकसभेचा गुलाल खाली पडत नाही तोच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चबांधणी सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर देत आहेत.

अशातच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा हादरे देण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत शिलेदार आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवाजी कापसे यांना शिंदे गटाने आपल्या गळाला लावलं आहे.

कापसे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. आज ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित परंडा येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहेत. यावेळी कापसे हे मोठे शक्तीप्रदर्शन देखील करणार आहेत.

शिवाजी कापसे हे कळंब-धाराशिव विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना विधानसभेचं तिकीट मिळणार का? याकडे देखील सर्वांच्या नजरा लागून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT