Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात जाणार

Maharashtra Political News : शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. माजी महापौरानंतर माजी आमदार शिवाजी चौथे यांनी ठाकरे गटातील सहसंपर्कप्रमुख पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Yash Shirke

  • शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून माजी आमदार शिवाजी चौथे यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला.

  • त्र्यंबक तुपे यांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर आता शिवाजी चौथे देखील शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू आहे.

  • चाळीस वर्षे शिवसेनेत काम केलेल्या शिवाजी चौथे यांच्या बाहेर पडण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे.

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून बाहेर पडले होते. त्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्र्यंबक तुपे याचा पक्षप्रवेश झाला.

मागील ३७ वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले त्र्यंबक तुपे यांनी आज शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेतले. हा पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. माजी आमदार शिवाजी चौथे यांनी ठाकरे गटातील पदाचा राजीनामा दिला आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे विद्यमान सहसंपर्कप्रमुख शिवाजी चौथे यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेशी चाळीस वर्षे एकनिष्ठ असलेल्या शिवाजी चौथे यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. त्र्यंबक तुपे यांच्या प्रमाणे शिवाजी चौथे देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

'चाळीस वर्षांपासून शिवसेनेमध्ये विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. या माध्यमामधून जनतेचे अनेक प्रश्न सोडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा स्नेह, प्रेम नेहमीच माझ्या पाठीशी राहिले. याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी शिवसेना पक्षातील सहसंपर्कप्रमुख पदाचा आणि पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे', असे माजी आमदार शिवाजी चौथे यांनी म्हटले आहे. राजीनामा दिल्यानंतर शिवाजी चौथे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes : गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा

Crime News: पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीचा उपवास; अंडा करीसाठी नकार देताच नवऱ्याची मती खुंटली, अन्...

BCCI चं १२५ कोटी रुपयांचं नुकसान; Dream ११ नंतर आणखी एका कंपनीने साथ सोडली?

Gautam Gaikwad: सिंहगडावरून तरुण बेपत्ता कसा झाला? ५ दिवसांत काय-काय घडलं, गौतम गायकवाडने सांगितला थरारक किस्सा

Ukraine Russia War: युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर ड्रोन हल्ला; रेडिएशनचा धोका,अण्वस्त्रयुद्धाची भीती

SCROLL FOR NEXT