Maharashtra Politics Heat Up: Shinde Camp Scores Major Political Gain in Thane saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजकारण जोमात! ठाकरेंसह शरद पवारांना मोठा दणका; बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Politics: ठाण्यात शिंदे गटाचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाकरे गट आणि शरद पवार गटातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

  • ठाण्यात शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

  • उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का

  • ठाण्यातील बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

विकास काटे, साम प्रतिनिधी

एकीकडे सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची याची सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद केला जातोय. मात्र दुसरीकडे शिंदे गटातील इनकमिंग जोरात सुरू आहे. आज ठाण्यात शिंदे गटाचा कार्यक्रमात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिंदेंनी ठाकरे गट आणि शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार दणका दिलाय. ठाण्यातील शिवसेनेच्या कार्यक्रमात ठाणे, वसई, विरारसह विविध ठिकाणच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश केलाय.

ठाण्यातील मातोश्री गंगुबाई शिंदे हॉल येथे हा पक्ष प्रवेश पार पडला. येथे ठाकरे गट आणि शरद पवार गट राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींचा आणि शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय. शरद पवार गटाच्या पालघर महिला जिल्हा अध्यक्षा मेघा म्हात्रे यांच्यासह रुपेश डोले श्रमजीवी महाराष्ट्र राज्य संघटक पालघर उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय.

शिवसेना ठाकरे गटाचे नालासोपारा परिसरातील उपविभाग प्रमुख , विधानसभा उप - संघटक, शाखा प्रमुख, युवासेना - पदाधिकारी यांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय. यांच्यासह कांदिवलीतील ठाकरे गटाचे 25 पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय. मुंबई उपनगरचे अपक्ष उमेदवार प्रमोद शिवाजी पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष मोहद मलिक यांनी शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलंय. जालना जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी सरपंच दत्ता पाटील खोजे, मार्केट समिती संचालक उपअध्यक्ष यांनी पदाधिकारी सोबत शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्ग अपघात प्रकरण , गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतली जखमीची भेट

Fatty liver symptoms: चेहऱ्यावर ही 6 लक्षणं दिसून आली तर समजा लिव्हर लवकरच होणारे खराब, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Diveagar Accident: सहलीला मजा करायला गेलो अन् ..., दिवेआगर येथे विद्यार्थ्यांचा मृत्यू कसा झाला? मित्रांनी सांगितला थरारक अनुभव

LPG Cylinder Price : LPG सिलेंडरच्या दरात मोठा बदल! 2 ऑक्टोबरला किती रुपयांना मिळतोय गॅस? जाणून घ्या नवीन दर

Sleep Duration by Age: ६ तास झोप पुरेशी आहे का? नवजात बालक ते वृद्धांपर्यंत; वयानुसार किती झोप आवश्यक

SCROLL FOR NEXT