Geetanjali Naik joins Congress Maharashtra latest news 
महाराष्ट्र

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Political Shift: माजी मंत्री वामनराव नाईक यांच्या नात गितांजली नाईक यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटातील नेते व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मुंबईतील टिळक भवन येथे विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Bharat Jadhav

  • माजी मंत्री वामनराव नाईक यांच्या नात गितांजली नाईक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • भाजप शिक्षक आघाडीचे अध्यक्ष विकास मुकुंदराव पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • बीड आणि खान्देशातील काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर पक्षाकडून भर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मोठी तयारी सुरू केलीय. महाराष्ट्रातही काँग्रेस नेते आपल्या पक्षातील मोर्चेंबांधणी करण्यास सुरुवात केलीय. त्याचाच भाग म्हणून जोरात इनकमिंग सुरू केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला जोरदार धक्का दिलाय. या दोन्ही पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना काँग्रेसनं गळाला लावलंय. माजी मंत्री वामनराव नाईक यांच्या नात गितांजली नाईक यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते ॲड. नरसिंह जाधव यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. भाजप शिक्षक आघाडी व उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ कल्याणचे अध्यक्ष विकास मुकुंदराव पाटील यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांचे स्वागत केलं.

यावेळी बोलताना डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केलंय. बीडसह ज्या जिल्ह्यांमध्ये पक्षांची ताकद नाहीये, तेथे संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे, जोमाने काम करून संघटनेची ताकद वाढविण्याची गरज असल्याचे सिरिवेल्ला यांनी सांगितले. २०२९च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचा विचार गावागावात पोहोचविण्याचे आवाहन या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी केलं.बीड जिल्ह्यासह खान्देशात झालेल्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

Maharashtra News Live Update: आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी एक महिना बंद

जगाचे हिरो स्मित हनुमानाचे निस्सीम भक्त, हनुमान चालिसा पठणामुळे संकटावर मात

सातारा बँकेच्या आखाड्यात मंत्री, खासदार, 4 मंत्री, 2 खासदारांची प्रतिष्ठा पणाला

सहल बेतली विद्यार्थ्यांच्या जीवावर, दिवेआगर किनाऱ्यावरील निष्क्रिय यंत्रणेचे 8 बळी

SCROLL FOR NEXT