Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Bhagwat Karad on Ambadas Danve: कावळ्याच्या शापाने जनावरं मरत नाही; भागवत कराड यांची अंबादास दानवेंवर टीका

Maharashtra Politics : हे सरकार कोसळणार नाही, सरकार कार्यकाळ पूर्ण करेल; 2024 मध्ये पुन्हा राज्यात आमचं सरकार येईल - भागवत कराड

लक्ष्मण सोळुंके

Political News : शिंदे सरकार कोसळेल असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलंय.दानवेंच्या या वक्तव्याचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी समाचार घेत त्यांना कावळ्याची उपमा दिलीय.कावळ्याच्या शापानं जनावरं मरत नाही असं सांगत शिंदे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून 2024 मध्ये आमचं सरकार पुन्हा सत्तेत येईल असंही कराड यांनी म्हटलंय. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीची वज्रमुठ ही एका विचाराची नसून सत्तेच्या लाचारासाठी आहे असंही कराड म्हणाले. भाजप (BJP) कुणाचेही आमदार फोडणार नाही पण तुम्ही आमदारांची कामं करणार नसाल आणि ते आमदार आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं सांगायलाही कराड (Bhagwat Karad) विसरले नाही.

अजित पवार (Ajit Pawar) भाजपच्या संपर्कात आहे की नाही याबाबत मला माहिती नाही असंही ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीची नागपूरची सभा होणारच असं म्हटलं आहे यावर बोलताना सभा घेण्याचा त्यांना अधिकार आहे मात्र ही वज्रमुठ नसून ढिली मूठ असल्याची टीका कराड यांनी केली. (Political News)

यावेळी भागात कराड यांनी कुठल्याही उद्योगाची सबसिडी हे सरकार बंद करणार नसून उद्योजकांशी चर्चा करून त्यांना विविध येणाऱ्या अडचणीची सोडवणूक हे सरकार करेल अस आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT