Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: धसांच्या खोक्याला शिकारीचा नाद; खोक्याने मारले हरिण, काळवीट आणि मोर, पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics: बीडच्या शिरुर तालुक्यात ढाकणे बाप-लेकाला अमानुष मारहाण प्रकरणात खोक्याच्या आणखी एका नव्या कांडाचा खुलासा झाला आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Bharat Mohalkar

धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. खोक्याने शिकारीला बंदी असलेल्या किती मोर, हरीण आणि काळवीटाची शिकार केली आहे? आणि या सगळ्या प्रकाराकडे प्रशासनाने का कानाडोळा केलाय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट आहे.

बीडच्या शिरुर तालुक्यातील ढाकणे बाप लेकाला अमानुष मारहाण करणाऱ्या खोक्याचं नवं कांड समोर आलं आहे. आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय असलेल्या खोक्या भोसलेने हरीण, काळवीट, मोर यांच्यासारख्या शिकारीला बंदी असलेल्या प्राणी आणि पक्षांच्या कत्तली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ढाकणेंनी शेतात हरीण पकडण्यास विरोध केल्याने खोक्या भोसलेने अत्यंत निर्दयीपणे दिलीप ढाकणेंचे दात पाडून जबडा मोडला. तर महेश ढाकणेंचा पाय निकामी केलाय. धसांचा कार्यकर्ता असलेल्या या खोक्या भोसलेने एक-दोन नाही तर शिकारीला बंदी असलेल्या हजारो प्राणी आणि पक्ष्यांच्या कत्तली केल्याची माहिती समोर आलीय. धसांचा कार्यकर्ता खोक्याचे राक्षसी कृत्य समोर आल्यानंतर आता त्याच्यावर मोका लावण्याची मागणी जोर धरु लागलीय.

बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड टोळीनंतर धसांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्या भोसलेची टोळी समोर आलीय...या टोळीकडून शिकारीला बंदी असलेल्या हरीण, मोर, काळवीटांची शिकार अशाप्रकारे खुलेआम होत असेल तर वनविभागा नेमकं करतोय तरी काय या प्रकरणात साम टीव्हीने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता वनविभागाला जाग आलीय. तर वनविभागाने शिरुर परिसरात हरिणाची शिकार झालेल्या भागात जाऊन तपास करुन हरणाचे अवशेष फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत..

त्यामुळे आता अमानुष मारहाण, हेलिकॉप्टरमधून एण्ट्री, पैशांची उधळपट्टी एवढंच नाही तर हरीण, मोर, काळवीट, ससे यासारख्या वन्यजीवांच्या हत्येनंतरही खोक्या भोसले मोकाट आहे. त्यामुळे निर्ढावलेल्या खोक्याच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT