Aamshya Padvi Saam Tv
महाराष्ट्र

Aamshya Padvi: आमश्या पाडवींकडून मारहाण आणि शिवीगाळ, तो व्हिडिओ व्हायरल

Aamshya Padvi Video: अक्कलकुव्याच्या सोरापाडा येथे भाजप आणि शिंदे गटात वाद झाला होता. आमदार आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.

Priya More

शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आमश्या पाडवी हे भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये ते पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मारहाण आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत.

अक्कलकुव्याच्या सोरापाडा येथे भाजप आणि शिंदे गटात वाद झाला होता. आमदार आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत पाडवी यांच्या विरोधात काम केल्याच्या रागातून भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि महिलेला आमश्या पाडवी यांनी मारहाण झाल्याचा आरोप आहे. आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी यांच्यासह कार्यकर्ते यांच्याविरोधात अक्कलकुवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

आमश्या पाडवी यांच्याविरोधात आरोप करणारी महिला आणि तिचा भाऊ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. या महिलेचा भाऊ भाजपा पंचायत समिती सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार आमश्या पाडवी यांच्या मुलीनेही भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, भाजप नेते नागेश पाडवी, भाजपा तालुका अध्यक्ष नितेश वळवी यांच्यासह पीडित महिला आणि तिच्या भावाविरोधात अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पाडवी यांच्या मुलीने देखील भाजप कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस आता या सर्वांविरोधात नेमकी काय कारवाई करतील हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, राजकीय समिकरणं बदलणार

Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन महिन्यांत स्वाईन फ्लूचे ६२६ रुग्ण

RBI Repo Rate Hike: होम लोन घेणाऱ्यांचे टेन्शन वाढलं, EMI वाढण्याची शक्यता; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Weight Loss : वजन घटवायचं असेल तर रात्री 'या' ५ पदार्थांना करा बाय-बाय, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT