Ajit Pawar vs Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar On Ajit Pawar: अजित पवारांबद्दल माझ्या मनात कुठलीही तक्रार नाही, बारामतीकरांसमोर शरद पवार काय म्हणाले?

Maharashtra Assembly Election 2024: बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे शरद पवार यांची प्रचार सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केले आहे.

Priya More

अक्षय बडवे, बारामती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. आज बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे शरद पवार यांची प्रचार सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केले आहे. '३० वर्षे अजित पवारांनी कामं केली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही.', असं वक्तव्य त्यांनी यावेळी केले. तसंच यावेळी त्यांनी युगेंद्रला उमेदवारी का दिली यामागचे कारण देखील सांगितले आहे.

शरद पवार यांनी सभेदरम्यान सांगितले की, 'तुम्ही मला जेव्हा निवडून दिलं तेव्हा मी विधानसभेत गेल्यावर एखादी योजना इथे करता येईल का? असा विचार केला होता. एका योजनेतून या भागात काहीसे पाणी यायला लागलं. दूध संघाची सुरुवात आम्ही केली ते नंतर १ लाख लिटरवर गेलं. आम्ही हे दूध पुण्यात पोहचवले. डायनॅमिक कंपनी बारामतीमध्ये आली. तिथे ८ लाख दूध येतं आणि त्यावर प्रक्रिया होते. शेती संकटात असेल तर दुसरा जोड धंदा पाहिजे.'

अजित पवारांबाबत बोलताना शरद पवारांनी सांगितले की, 'राजकारण फक्त सत्ता आणि निवडणुकीसाठी नाही. राजकारणाचा वापर लोकांच्या जीवनात झाला तर त्याचा उपयोग आहे. तुम्ही ४ वेळा मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं. २५ वर्षे मी बारामतीमध्ये काम केलं. पुढची सत्ता अजितदादांच्या हातात दिली आणि निर्णय तुम्ही घ्यायचं सांगितलं. ३० वर्षे अजित पवारांनी कामं केलं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही.'

युगेंद्रला उमेदवारी का दिली याबद्दल शरद पवार म्हणाले की, 'पुढची तयारी करायची असेल तर नेतृत्व तयार करावं लागेल. नवीन नेतृत्व तयार करायचं आहे म्हणून युगेंद्रला उमेदवारी दिली. मी मत मागायला आलो नाही तुम्ही मला मतं द्यायला कधी काट कसर केली नाही. माझी निवडणूक असो, अजितदादांची निवडणूक असो, सुप्रियाची असो तुम्ही कधी नाही म्हणाला नाहीत. लोकसभा कौटुंबिक राजकारणाची होती तरी तुम्ही सुप्रियाला मतदान केलं. युगेंद्रचे चिन्ह तुम्हाला माहिती आहे. या दिवसांचा उपयोग करा त्याचे चिन्ह लोकांपर्यंत पोहचवा.'

तसंच, '१८ तारखेला शेवटची सभा बारामतीमध्ये घ्यायला येईल. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि माझी उद्या मुंबईत सभा होणार आहे. त्यानंतर मी नागपुरमध्ये जाईल आणि तिथून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि शेवटी बारामतीमध्ये येईल. राज्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. सगळीकडे येणं शक्य नाही. जेवढं जायला लागेल तिकडे जाईल. निवडणुकीचे काम हातात घ्या आणि सांभाळा.', असे आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Pav Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी स्पेशल ब्लॅक पावभाजी; वाचा सोपी रेसिपी

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना- विकी झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Manoj Jarange Patil : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धनंजय मुंडेंनी हत्येचा कट रचला, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Cheapest Plans: Jio, Airtel आणि Vi चे बजेट प्लॅन, कमी पैशात २८ दिवस कॉलिंग, डेटा अन् बरंच काही...

Bigg Boss 19: या स्पर्धकाला बिग बॉसने दिली सुपर पॉवर; आता घरातील सदस्यांना करणार नॉमिनेट

SCROLL FOR NEXT