Balasaheb Thorat
Balasaheb Thorat saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आमची चर्चा झाली, पण फॉर्मुला अद्याप ठरला नाही; संजय राऊतांच्या वक्तव्यावर थोरातांची प्रतिक्रिया

Chandrakant Jagtap

>> सचिन बनसोडे, साम टीव्ही

Balasaheb Thorat On MVA Formula For Lok Sabha : आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसलो होतो चर्चा आमची झाली आहे. परंतु जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरला नाही ही वस्तुस्थिती आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती.

या बैठकीत महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी फॉर्मुला ठरला असून 16-16-16 जागांवर तिन्ही पक्ष लढणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर बोलताना थोरात यांनी असं काही अद्याप ठरलं नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते संगमनेर येथे बोलत होते.

जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरला - थोरात

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) 19 जागांवर निवडून आलेली आहे. त्या सर्व विजयी जागांवर आम्ही लढणार असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसलो होतो, आमची चर्चा झाली. परंतु जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरला नाही ही वस्तुस्थिती आहे. (Breaking News)

प्रत्येक जण आग्रही राहणार आहे तसे ते सुद्धा आग्रही आहेत. निवडून कोण येईल हा विषय जागा वाटपात महत्त्वाचा मुद्दा असेल. महाविकास आघाडी एकत्र लढली तर 48 पैकी ४० जागा निवडून येतील असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

भाषणाची पद्धत सुधारण्याची आवश्यकता - थोरात

यावेळी बोलताना थोरात म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नेते खालच्या स्तराला जाऊन बोलत असतात. त्यानंतर समोरच्या बाजूने सुद्धा अशी वक्तव्य केली जातात. मात्र सगळ्यांनीच आपल्या भाषणाची अथवा बोलण्याची पद्धत सुधारण्याची आवश्यकता आहे. (Latest Political News)

हिंदू मते मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न - थोरात

त्र्यंबकेश्वर वादावर बोलताना थोरात म्हणाले, भाजपाला सध्या अधोगती लागली आहे. समाजात भेद निर्माण करून मतांची पोळी भाजणं हाच भाजपाचा एकमेव अजेंडा आहे. हिंदू मते मिळवण्याचा भाजपाचा सध्या प्रयत्न सुरु आहे. मात्र जनता हुशार झाली आहे, हे कर्नाटक निवडणुकीत दिसून आलं. कर्नाटकात बजरंगबली काँग्रेसला पावन झाले,आता जनता फसणार नाही, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Accident : वऱ्हाडाच्या गाडीला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाला पलटी, १५ वऱ्हाडी जखमी

Mango Health Benefits: उन्हाळ्यात दररोज खा एक कच्चा आंबा; होतील जबरदस्त फायदे

Jalna Lok Sabha: मनोमिलन झालं, मतभेद मिटले! रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी अर्जून खोतकर उतरले मैदानात

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जालन्यात मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना घेरलं

Summer Health: घामोळ्या, पुरळसारख्या समस्यांवर रामबाण उपाय; त्वाचेच्या सर्व समस्या होतील गायब

SCROLL FOR NEXT