Balasaheb Thorat Sharad Pawar Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar Retirement: 'लोकशाही वाचवायची आहे, त्यांना...' शरद पवारांच्या निर्णयावर बाळासाहेब थोरात यांचे मोठे विधान

Sharad Pawar resigns as NCP chief: शरद पवार यांच्या या निर्णयावर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, प्रतिनिधी....

Balasaheb Thorat On Sharad Pawar Retirnment: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. या मोठ्या निर्णयानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. एकीकडे साहेब निर्णय परत घ्या म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्ते नेते रस्त्यावर उतरले असताना महाविकास आघाडीतही मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या या निर्णयावर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईमध्ये सुरू होता. याच कार्यक्रमात शरद पवारांनी (Sharad Pawar) अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ज्यानंतर कार्यकर्ते आणि नेते प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या निर्णयाविरोधात राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात..

शरद पवार यांच्या या निर्णयानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून देशाची लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी शरद पवारांना बाजूला जाऊन चालणार नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

लोकशाही वाचवण्याचे नवे युद्ध सुरू...

तसेच "लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी स्वातंत्र्याचे नवे युद्ध सुरू आहे. यामध्ये शरद पवारांचे महत्व अनन्य साधारण आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींना या लढाईत साथ देणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींमध्ये शरद पवार," असल्याचेही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांच्या या निर्णयानंतर पवार साहेब निर्णय मागे घ्या, देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो..! अशा घोषणा देत कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. तसेच दोन जिल्हाध्यक्षांनी या निर्णयाविरोधात राजीनामाही दिला आहे.. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT