Bachchu Kadu Saam TV
महाराष्ट्र

Bachchu Kadu: 'विधानसभेत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी असणार', बच्चू कडूंचे मोठे विधान; पाठिंबा कुणाला? सांगूनही टाकलं

Maharashtra Politics Latest News: प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी तयार करण्याच्या विचारात असल्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे. सोलापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

विश्वभूषण लिमये

सोलापूर, ता. २९ जुलै २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने महायुती तसेच महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी तयार करण्याच्या विचारात असल्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे. सोलापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले बच्चू कडू?

"आम्ही स्वतःची आघाडी करण्याचा विचार करतोय. सध्यातरी अजून युतीमध्ये आहोत, 9 तारखेला आम्ही आमची ताकद दाखवू . त्यानंतर निर्णय घेऊ, आम्हाला तिसरी आघाडी म्हणू नका, आम्ही पहिली आघाडी आहोत मुळ शेतकऱ्यांची आघाडी, असे म्हणत आमचे 16 मुद्दे आहेत ते जर मान्य होतं असतील तर कोणीही मान्य करेल त्या आघाडी युतीला आमचा पाठिंबा असेल," अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली.

विधानसभेला तिसरी आघाडी!

तसेच "ज्या योजना काँग्रेस सरकारने करण्याचा प्रयत्न केला, तेच जर युती करणार असेल तर काय अर्थ आहे. आम्ही मुद्यावर लढतोय आम्हाला विधानसेभेची अपेक्षा नाही. आमचा मुद्दा मान्य झाला तर आम्ही ज्यांनी तो मान्य केला त्यांना पाठिंबा देऊ," असेही बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, :महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती होण्याची भिती शरद पवार यांनी व्यक्त केली होती. यावरही बच्चू कडू यांनी महत्वाचे विधान केले आहे. महाराष्ट्र आणि मणिपूरची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे तशी स्थिती महाराष्ट्रामध्ये येईल असं मला वाटतं नाही, शरद पवारांनी असं विधान का केलं माहिती नाही," असं बच्चू कडू म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT