Amol Mitkari SaamTv
महाराष्ट्र

Ashok Kharat: अजितदादांच्या घर अन् कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली; अमोल मिटकरींचा दावा

Amol Mitkari On Ashok Kharat Case: खरात प्रकरणातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांच्या निवासस्थानाजवळ कथित जादूटोणा होत असल्याच्या अमोल मिटकारी यांच्या दाव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Bharat Jadhav

  • अमोल मिटकरींचा अघोरी पूजेचा दावा

  • अजित पवारांच्या घराजवळ घटना झाल्याचा आरोप

  • खरात प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न

विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. यावरून प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचाराजीनामा द्यावा लागला आहे.

आता, याप्रकरणावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या अपघाताचे कनेक्शन तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला आहे. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती, अशी माहितीही मिटकरी यांनी दिली.

खरातच कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणारा आहे, आपला भांडाफोड होणार हे अशोक खरातला माहित झालं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी लुकआउट नोटीस काढल्याने तो पळून गेला नाही. असं सांगताना मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघतावरून पुन्हा संशय व्यक्त केला. अजितदादांच्या अपघाताशी खरात प्रकरणाचा संबंध असू शकतो. कारण या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरे असून सप्टेंबर महिन्यात अनामिका कापण्याचा प्रकार सर्वात अघोरी असल्याचे अमोल मिटकरी म्हणालेत.

नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली, अशोक खरात आणि अजितदादांचा अपघात याच्यात संबंध आहे का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला असून गेल्या तीन दिवसापासून अजित दादांचा विषय मागे पडलाय. जितक्या तत्परतेने अशोक खरात पकडला तशीच तत्परता अजित दादांचा प्रकरणात झाली पाहिजे, अशी मागणीही मिटकरी यांनी केली.

नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली, अशोक खरात आणि अजितदादांचा अपघात याच्यात संबंध आहे का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला असून गेल्या तीन दिवसापासून अजित दादांचा विषय मागे पडलाय. जितक्या तत्परतेने अशोक खरात पकडला तशीच तत्परता अजित दादांचा प्रकरणात झाली पाहिजे, अशी मागणीही मिटकरी यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT