Jai Pawar Meet Manoj Jarange Patil Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अंतरवाली सराटीत राजकीय खलबतं? जय पवारांनी अचानक घेतली मनोज जरांगेंची भेट, चर्चांना उधाण

Jai Pawar Meet Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. आज अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी अचानक मनोज जरांगेची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Rohini Gudaghe

लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही जालना

अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. आज अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी अचानक मनोज जरांगेची भेट घेतली आहे. .यावेळी जय पवार यांच्यासोबत सूरज चव्हाण देखील असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जय पवार आणि जरांगे यांच्या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमुळे (Jai Pawar Meet Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटीत राजकीय खलबतं शिजत आहेत का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

तर अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी जय पवार यांचं स्वागत केल्याची माहिती मिळत (Maharashtra Politics) आहे. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आज अचानक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीचं सत्र सुरूच असल्याचं दिसतं. त्याचदरम्यान ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Manoj Jarange Patil) यांचे पुत्र जय पवार हे हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरला आले होते. माध्यमांना न कळवता ते थेट कारने अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. त्याठिकाणी तब्बल अर्धा तास त्यांनी मनोज जरांगे पाटलांची वाट पाहिल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर जरांगे पाटील आल्यानंतर त्यांनी जय पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांचं स्वागत (Jalna News) केलं.

आंतरवली सराटी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि सूरज चव्हाण यांनी आज मनोज जरंगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मात्र, यावेळी जरांगे पाटील आणि जय पवार यांच्यात (Jai Pawar Meet Manoj Jarange) कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिळत आहे. तरीही राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलं आहे. या भेटीमुळे आता अंतरवाली सराटीमध्ये नेमकी कोणती राजकीय खलबतं सुरू आहेत, अशी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT