Ajit Pawar  Saamtv file photo
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Ajit Pawar News : विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे.

Namdeo Kumbhar

Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी नाकारल्याचा फटका महायुतीला बसला होता. त्यामुळेच आता होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे वृत्त हाती आलेय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आपल्या कोट्यातली दहा टक्के जागा मुस्लिम उमदेवारांना देणार आहेत.

अजित पवारांची सावध भूमिका, मुस्लिम उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय -

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजतेय. पक्षाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याचे समोर आलेय. जागा वाटपात मिळणाऱ्या एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर मुस्लीम उमेदवार देण्याचा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेतला आहे.

मुंबईत अजित पवारांना किती जागा मिळणार ?

जागावाटपासाठी महायुतीच्या बैठकावर बैठका सुरु आहेत. सध्या ८० टक्के पेच सुटला आहे. पण उर्वरित जागांचा तिढा कायम आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी अजित पवार यांना चार जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार या चारही जागांवर मुस्लिम उमेदवार देणार आहे.

मुंबईत चार आणि एमएमआर रिजनमध्ये १ अशा ५ जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लीम उमेदवार देणार असल्याचे समोर आलेय. महायुतीमध्ये मुंबईत राष्ट्रवादीला ४ जागा सुटणार आणि चारही जागांवर मुस्लीम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देण्याची शक्यता आहे. त्याशिवाय प्रत्येक प्रादेशिक विभागात एक मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कऱण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेय.

मुंबईमध्ये अजित पवार कुणाला उमेदवारी देणार? संभाव्य उमेदवार

नवाब मलिक

सना मलिक

जिशान सिद्दीकी

नजीम मुल्ला

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पण राजकीय नेत्यांनी अंदाज वर्तवलाय. त्यानुसार, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० ते २० नोव्हेंबर यादरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होऊ शकतात. त्याशिवाय यावेळी राज्यातील निवडणुका दोन टप्प्यात होऊ शकतात, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT