Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवार गटाला मोठा झटका, बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Political News : अजित पवार गटातील विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. हा अजित पवार गटासाठी धक्का मानला जात आहे.

Saam Tv

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, ठाणेनंतर शिंदे गटाचा उर्वरित महाराष्ट्रातही विस्तार होत आहे. माजी आमदार कैलास पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला.

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार कैलास पाटील यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आज (८ सप्टेंबर) कैलास पाटील यांनी पदाधिकारी मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेतले. एकनाथ शिंदे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान पाटील यांची शिंदे गटात प्रवेश केला.

छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आले. मोठा हार आणि जीसीबीवरून पुष्पवृष्टी करीत शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे (८ सप्टेंबर) आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा घेत आहेत.

शिवसेनेकडून कैलास पाटील गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. १९९० मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या साहेबराव पाटील डोणगावंकर यांचा पराभव केला. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले होते. त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कैलास पाटील अजित पवारांसोबत गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT