अजित पवार गटाची रायगड जिल्ह्यातील राजकीय ताकद
अलिबाग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय खेळी
महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघातील राजकीय घडामोडी
अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक होतेय. या बैठकीआधी राष्ट्रवादी नेत्यांच्या कानी आनंदाची बातमी आली, ही बातमी म्हणजे अर्थ मंत्रालय राष्ट्रवादीला परत मिळणार आहे. दुसरीकडे अर्थखात्याबाबत आनंदाची वार्ता येताच शिवसेनेला मोठा धक्का राष्ट्रवादीनं दिलाय. रायगडमध्ये तब्बल २०० शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत हाती घड्याळ बांधलंय.
रायगड जिल्ह्यात 'महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी राजकीय वाद सर्वश्रुत आहे. आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील राजकीय संघर्ष तीव्र होऊ लागलाय. अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय.
शेनवाई गावातील आदिवासी पाड्यावरील २०० हून अधिक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केलाय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेला हा पक्षप्रवेश पार पडलाय. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करण्याच्या आणि शिंदे गटासमोर राजकीय आव्हान उभे करण्याच्या दृष्टीने एक पाऊल मानला जातोय.
या नेत्यांच्या फोडाफाडीनंतर रायगड जिल्ह्यात 'महायुती'मधील राजकीय संघर्ष आता उघड झालाय. हे दोन्ही पक्ष राज्य सरकारमध्ये भागीदार असले, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावताना दिसत आहेत.
दरम्यान अलिबाग विधानसभा मतदारसंघातील शेणवाई गावातील एका आदिवासी पाड्यावरील २०० हून अधिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केलाय. हा भाग शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या विधानसभा मतदारसंघांतर्गत येतो. त्यामुळे ही घडामोड त्यांच्यासाठी एक राजकीय धक्का मानली जातेय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत काही ग्रामस्थांनी पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमादरम्यान तटकरे यांनी नवीन सदस्यांचे स्वागत केले. दरम्यान या नेत्यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केल्यामुळे रायगडच्या स्थानिक स्तरावर आपला संघटनात्मक पाया अधिक मजबूत करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालीय. विशेष म्हणजे, हा पक्षप्रवेश अशा भागात झाला आहे, जेथे शिवसेनेच्या शिंदे गटाचं वर्चस्व आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.