Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपच्या वर्ध्याच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा, कोणाच्या पदरात पडणार लोकसभेची जागा?

Maharashtra Politics Update: महायुतीने तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे एकत्र संपूर्ण राज्यात मेळावे घेत आहे.याअनुषंगाने वर्ध्यातही पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याच्या माध्यमातून तिन्ही पक्षांमध्ये एकजूटता असून समन्वय दाखवल्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपच्या ताब्यात असलेली वर्धा लोकसभाची जागा अजित पवार गटाने मागितल्याने आपसात धूसफूस सुद्धा पहावयास मिळत आहे.

Sandeep Gawade

चेतन व्यास

Maharashtra Politics

महायुतीने तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे एकत्र संपूर्ण राज्यात मेळावे घेत आहे.याअनुषंगाने वर्ध्यातही पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याच्या माध्यमातून तिन्ही पक्षांमध्ये एकजूटता असून समन्वय दाखवल्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपच्या ताब्यात असलेली वर्धा लोकसभाची जागा अजित पवार गटाने मागितल्याने आपसात धूसफूस सुद्धा पहावयास मिळत आहे. एवढंच नव्हे तर या लोकसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व असून ही जागा भाजपाकडेच असणार असल्याच भाजप नेते बोलत आहे.

अजित पवार गटाचे नेते सुबोध मोहिते यांनी विदर्भातील तीन जागावर लोकसभेसाठी अजित पवार गट दावा करणार असल्याच सांगितलं होत. यात भंडारा - गोंदिया, गडचिरोली व वर्धा लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. अजित पवार गटाच्या दाव्यानंतर भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी वर्धा लोकसभेची जागा ही भाजपाकडेच राहणार असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा जिल्ह्यात एकही कार्यकर्ता नसल्याचा टोला लागवला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सामान्य नागरिकांना महायुतीच्या घटक पक्षात एकजटता दिसावी व आपसात जगावाटपावरून सुरू असलेली धसफूस बाहेर जाऊ नये महायुतीचे एकत्रित मेळावे घेत जनतेत तिन्ही पक्षात समन्वय असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे यंदा भाजपकडून सत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना उमेदवारी देणार नसल्याची माहिती समोर आल्याने माजी मंत्री सुभाष भांबरे व रामदास तडस यांचा पत्ता कटणार असल्याची चर्चा असल्याने अजित पवार गट या जागेसाठी आग्रह धरणार असल्याची माहिती आहे.

आजच्या मेळाव्यात केंद्र व राज्य सरकारच्या जनउपयोगी योजना सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने व 2024च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा विजय प्राप्त करण्याचा संकल्प घेण्यात आलाय. लोकसभेकारिता महायुतीचे वरिष्ठ नेते जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितलंय.

आज संपूर्ण राज्यात महायुतीचे मेळावे घेण्यात आले. वर्धेतही तिन्ही घटक पक्षाचा मेळावा पार पडला असून मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्याकरिता आम्ही एकजुटीने काम करणार असल्याच आज संकल्प घेण्यात आला आहे. अजित पवार गटाने विदर्भात तीन लोकसभेच्या जागा मागितल्या आहे. भंडारा -गोंदिया ही प्रफुल पटेल, गडचिरोली ही धर्मारावबाबा आत्राम व वर्धा ही माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्याकरिता अजित पवार गटाने मागितली आहे.पक्षश्रेष्टी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं मत अजित पवार गटाचे नेते राणा रणनवरे यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT