Maharashtra Political News Saamtv
महाराष्ट्र

NCP MLAs Oath Ceremony: भरदुपारी मोठा राजकीय भूकंप! अजित पवार उपमुख्यमंत्री; 'या' ९ आमदारांचा शपथविधी होणार

Ajit Pawar news in marathi: शिंदे - फडणवीस सरकारला एक वर्ष पुर्ण होवून दोन दिवस उलटले असतानाच राज्यात नवा राजकीय भूकंप झाला आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Political News: शिंदे - फडणवीस (Shinde- Fadanvis) सरकारला एक वर्ष पुर्ण होवून दोन दिवस उलटले असतानाच राज्यात नवा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांचा शिंदे फडणवीस सरकारला पाठींबा दिला आहे. त्यामुळे आता अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. (Maharashtra Political News)

९ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ...

आज सकाळपासून राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक अजित पवारांच्या (Ajit Pawar) शासकीय निवासस्थानी सुरु होती. या बैठकीनंतर अजित पवार काही आमदारांसह राजकारणाचे दिशेने जात असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच शपथविधी सोहळ्याची तयारीही सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.यामध्ये राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे ९ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे, बाबूराव अत्राम यांची नावे चर्चेत आहेत.

दरम्यान, आज सकाळी अजित पवार यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीला दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, किरण लहमाटे, सरोज अहिरे, अशोक पवार, अनिल पाटील, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, दौलत दरोडा, अनुल बेणके, रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे, निलेश लंके, मकरंद पाटील यांचा समावेश होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT