AFTER MPS, WILL MLAS ALSO LEAVE UDDHAV THACKERAY? THREE LEGISLATORS SKIP CRUCIAL MEETING Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: खासदारांनंतर आमदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 3 आमदारांची बैठकीला दांडी

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला तीन आमदार अनुपस्थित राहिल्याने नवीन राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सहा खासदार शिंदे गटात सामील होत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडत आहे.

Bharat Jadhav

ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. नऊ पैकी सहा खासदारांनी बंड फुकारल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. आता खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत, त्यांनी पक्षाची मोटबांधणीस सुरुवात केली आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज आमदारांची बैठक बोलवली होती,मात्र या बैठकीला तीन आमदार गैरहजर राहिलेत. बैठकीला तीन आमदारांनी दांडी मारल्यानं आता पु्न्हा तर्क वितर्कांना उधाण आले आहे. खासदारांप्रमाणे आमदारांमध्येही नाराजी आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस हे तीन आमदार गैरहजर राहिले होते.

खासदारांप्रमाणे आमदारांमध्येही नाराजी आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस हे तीन आमदार गैरहजर राहिले होते. ऑपरेशन टायगर च्या मोहिमेतून एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार पाडलं. ठाकरे गटातील सर्वाधिक चर्चेतील आणि डायनामाईट खासदारांना पक्षातून फोडत आपल्या गटात ओढलंय.

इतकेच नाही शिंदे गटात गेलेल्या खासदारांपैकी एकाच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडणार आहे. दुसरीकडे खासदारांच्या या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी आमदारांची बैठकी बोलवली आहे. पक्षातील आमदारांना एकसंध बांधून ठेवण्यासाठी त्यांच्यात काही अस्वस्थता आहे का किंवा असेल तर ते दूर करण्यासाठी शिवालय येथे उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

मात्र याच बैठकीला तीन आमदारांनी दांडी मारली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. खासदारांनंतर आता आमदारही ठाकरेंची साथ सोडणार का असा सवाल केला जातोय. कारण खासदारांप्रमाणेच आमदारांनीही कित्ता गिरवला आहे. शिंदे गटात जाण्याआधी खासदारांनीही ठाकरेंच्या बैठकींना दांड्या मारल्या होत्या. आता या तीन आमदारांनीही दांडी मारली आहे. संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस हे तीन आमदार बैठकीला आले नाहीत, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

नगरसेवक, आमदारही जाणार - शिंदे गटाचा दावा

सहा खासदारांनी ज्यावेळी बंड फुकारत ठाकरेंची साथ सोडली होती, त्यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठं विधान केलं होतं. उद्धव ठाकरेंवर नगरसेवक आणि आमदार पक्षनेतृत्त्वावर नाराज असल्याचं म्हटलं होतं. तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे तब्बल १४ ते १५ आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. योग्य वेळ आल्यावर सर्व काही समोर येईल, असं बांगर म्हणाले होते. आता तीन आमदार बैठकीला गैरहजर राहिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : गोकुळ गीते ओझर विमानतळाच्या दिशेने रवाना

Raw milk face pack: दररोज कच्च्या दुधात मिसळा 'हा' पिवळा पदार्थ; मिळेल ग्लोईंग आणि सॉफ्ट त्वचा

मोठी बातमी! शिंदेसेनेला मोदी सरकारमध्ये दोन मंत्रिपदं मिळणार? 'ही' नावे चर्चेत

मानेवरचे हट्टी काळे डाग जात नाहीत? मग स्वयंपाकघरातील 'या' 3 गोष्टी वापरून घरीच करा उपाय

Blood Pressure : हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? रोज खा हे 1 फळ BP राहील नियंत्रणात

SCROLL FOR NEXT