PM Modi Wrote Letter To CM Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मुंडे, कोकाटेंवर कारवाई होणार? कुणाचीही पर्वा करू नका, पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्र्यांना आदेश

PM Modi Wrote Letter To CM Fadnavis: दिल्लीतील शपथविधी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यात चर्चा झाली होती, आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

Bharat Jadhav

महायुतीच्या सरकारचे प्रशासन स्वच्छ असावे. राज्य करताना कोणाचीही पर्वा करू नका, असे आदेश पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेत. पंतप्रधान मोदींच्या या आदेशामुळे आरोप होणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.

राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेत. दोन्ही मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सरपंच हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे संकटात सापडलेत. तर अजित पवार गटाचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे हेदेखील एका जुन्या वादामुळे अडचणीत आलेत. दिल्लीतील शपथविधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.

त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील समोर आलाय. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वच्छ प्रशासन करा असे आदेश दिलेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजीनामे घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तळात होत आहे. राज्यातील प्रशासन स्वच्छ असावे, त्यात कुणाचीही पर्वा करू नका, असे आदेश देणार पत्र पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता विराजमान झाल्या आहेत. रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्याला एनडीए सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी फडणवीस यांना स्वच्छ प्रशासन करावे असे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT