Sadabhau Khot on Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : संजय राऊत घरकोंबडा, शरद पवार राजकारणात आग लावतात; सदाभाऊ खोत भडकले

Sadabhau Khot News : आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या भडक वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Namdeo Kumbhar

Sadabhau Khot on Sanjay Raut and Sharad Pawar : सांगली : संजय राऊत घरकोंबडा आहे, रोज आरोळी देतो, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा समाजाला पाठिंबा आहे, असे पत्र द्यावे. महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचे काम बंद करावे. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील वळू रेड्यानं चाबकाने फोडून काढणार, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलेय. ते सांगलीच्या शिराळा येथील रयत क्रांती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

संजय राऊतांवर टीकास्त्र -

संजय राऊत नावाचा घरकोंबडा रोज एक आरोळी देतो. रोज भांग देऊ नकोस खुरुड्यातनं, असे त्या कोंबड्याला मी सांगत आहे, असा टोला खोत यांनी लगावला.

तू एक पत्र लिहून दे जरांगे पाटलांना माझी उबाठा सेना मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे. तुझ्यात जोर आहे का, हे पाहयूता, असे वक्तव्य आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.

शरद पवार आग लावण्याच काम करतात -

तसेच महाराष्ट्रामध्ये राजकारणात आग लावण्याचे काम शरद पवार करत आहेत, हे वेळीच मराठा समाजाने ओळखलं पाहिजे. सगळं दिल्यानंतर या राज्यांमध्ये मराठा समाजामध्ये धुई माजवण्याचे काम करत आहेत. मी अनेक वेळा वक्तव्य केले जी माणसं महाविकास आघाडीची निवडून आली, त्यांनी एक पत्र लिहावं सरकारला. एक पत्र लिहावं जरांगे पाटलांना मी खासदार अमुक.. अमुक लिहून देतो की मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे.

रोहित पवार विद्वान माणूस आहे, आग लावत तुम्ही महाराष्ट्रात सुटलाय. भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रात तुम्ही ठेवलीय. मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला पाठिंबा असल्याचं रोहित पवारांनी लिहून द्यावे. नाहीतर हे आग लावायचे धंदे या महाराष्ट्रातून बंद करा. लोकसभेला जमलं म्हणून आता जमल ही भावना काढून टाका, अशी कडाडून टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर अनेक चांगले निर्णय घेतले. अनेक योजना आणल्या. पण महाविकास आघाडीचे नेते टीका करतात. पण येणाऱ्या निवडणुकीत या महाविकास आघाडीतील वळू रेड्यानं चाबकाने फोडून काढू अशी टीका ही खोत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT