Maharashtra Politics 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics 2024 : 'गडकरींना पाडण्यासाठी मोदी-शाहांचे प्रयत्न'; 'फडणवीसांनी पुरवली रसद', संजय राऊतांच्या आरोपांमुळे काँग्रेसचाही संताप

Lok Sabha Election 2024 : या लोकसभा निवडणुकीत गडकरींना संपवण्याचे प्रयत्न झाल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. यासाठी मोदी-शाह यांच्यासह फडणवीसांनीही मोठी रसद पुरवल्याचा दावा राऊतांनी केलाय.

Sandeep Gawade

विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

या लोकसभा निवडणुकीत गडकरींना संपवण्याचे प्रयत्न झाल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. यासाठी मोदी-शाह यांच्यासह फडणवीसांनीही मोठी रसद पुरवल्याचा दावा राऊतांनी केलाय.विशेष म्हणजे या आरोपांना भाजपनं तर उत्तर दिलंच, मात्र काँग्रेसनंही आक्षेप घेतला. नेमकं काय आहे हे प्रकरण, पाहूयात विशेष रिपोर्ट.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जसा जवळ येतोय तस-तसे नवनवीन गौप्यस्फोट आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या मुखपत्रात खासदार संजय राऊत यांनी असाच एक खळबळजनक आरोप केलाय. नागपूरचे भाजप उमेदवार आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी भाजपचंच केंद्रातलं आणि राज्यातलं नेतृत्व सरसावल्याचा आरोप त्यांनी केला. यात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलंय. संजय राऊतांनी आपल्या रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात.

गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे 'योगी को बचाना है, तो मोदी को जाना है' हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल.

राऊतांनी केलेल्या या आरोपांवर भाजपाच्याआधी काँग्रेसनंच आक्षेप घेतलाय. गडकरींविरोधात नागपूरच्या मैदानात असलेल्या काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी राऊतांचा समाचार घेतला. तर ठाकरे गटानं राऊतांच्या आरोपांना जोरदार दुजोरा दिला. भाजपनं राऊतांचे आरोप फेटाळून लावले आहेत. राऊतांना प्रसिद्धीचं व्यसन जडल्यामुळेच ते असले आरोप करतात असा पलटवार मंत्री मुनगंटीवारांनी केलाय.

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत गडकरींना डावलण्यात आल्यामुऴे तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. मोदी-शाह आणि गडकरी यांच्यातल्या सुप्त संघर्षाची याला किनार असल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती. आता संघाचा हवाला देऊन राऊतांनी या वादाला पुन्हा एकदा हवा देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे नागपूरच्या निकालाबाबत राज्याच्या जनतेत अधिकच उत्सुकता निर्माण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT