Narayan Rane Vs Vinayak Raut  SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : नारायण राणेंच्या मंत्रिपदाबाबत खासदारांची भविष्यवाणी; म्हणाले, त्यांच्यासारख्या गद्दार...

Narayan Rane Vs Vinayak Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक 'फटकेबाजी' सुरू असतानाच, खासदार विनायक राऊत यांनी मोठा 'राजकीय फटाका' फोडला आहे.

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी

Narayan Rane Vs Vinayak Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक 'फटकेबाजी' सुरू असतानाच, खासदार विनायक राऊत यांनी मोठा 'राजकीय फटाका' फोडला आहे. केंद्रात मिळालेलं मंत्रिपद पुढचे चार महिने टिकतं का, याची काळजी नारायण राणेंनी घ्यावी, असं विनायक राऊत म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेना, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकेची तोफ डागणाऱ्या नारायण राणेंवर राऊत यांनी 'प्रहार' केला. यावेळी त्यांनी नारायण राणेंच्या केंद्रातील मंत्रिपदाबाबत मोठी भविष्यवाणी केली.

केंद्रात मिळालेलं मंत्रिपद पुढील चार महिने टिकते का त्याची नारायण राणे (Narayan Rane) यांनी काळजी घ्यावी, असं विनायक राऊत म्हणाले.

नारायण राणे यांच्यासारख्या गद्दार आणि स्वार्थी माणसाचं आम्ही मनावर घेत नाही. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी नारायण राणे हे शिवसेनेवर टीका करत आहेत, असंही ते म्हणाले.

नारायण राणे यांचे वक्तव्य आम्ही गांभीर्याने घेत नाही. स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या स्वार्थासाठी त्यांनी शिवसेनेशी (Shivsena) बेइमानी केली. काँग्रेसशी बेइमानी केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीसांविषयी (Devendra Fadnavis) अपशब्द वापरले.

आता आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करायची. हाच एक त्यांचा धंदा राहिला आहे. जे काही मंत्रिपद मिळाले आहे, ते पुढचे चार महिने टिकते की नाही याची त्यांनी काळजी घ्यावी, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद उफळला

Padded Blouse Designs: बॅकलेस आणि डीप नेक साडीवर उठून दिसतील पॅडेड ब्लाऊज, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT