NCP New Song Saam Tv
महाराष्ट्र

NCP New Song: गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी!, जन सन्मान यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचं नवं गाण लाँच; पाहा VIDEO

NCP Jansanman Yatra: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभरामध्ये जन्मसन्मान यात्रा काढली. नाशिकमधून या जन सन्मान यात्रेला सुरूवात झाली.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने (NCP Ajit Pawar Group) विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) कंबर कसली असून त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभरामध्ये जन्मसन्मान यात्रा काढली. नाशिकमधून या जन सन्मान यात्रेला सुरूवात झाली असून याठिकाणावरून अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकले. या जन्मसन्मान यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीप्रदर्शन करणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन गाणं लाँच केले आहे. या गाण्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

'गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी!', असं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या गाण्याचे नाव आहे. 'काम करत आलोय, काम करत राहू.', अशी नवी टँगलाईन वापरून हे गाणं तयार करण्यात आले आहे. अजित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर या नव्या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अजित पवार यांनी 'गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी! आलंय राष्ट्रवादीचं नवं गाणं!', असे लिहिले आहे. या गाण्यामध्ये अजित पवार गटाचे सर्व नेते, त्यांच्या बैठका-सभा, नव्या प्रकल्पांचे उद्घाटन, नव्या घोषणा, केलेली कामं, लडकी बहीण योजना या सर्व गोष्टींची झलक पाहायला मिळत आहे.

जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहचण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असणार आहे. या जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवार गटाचे सर्व नेते देखील सहभागी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे या यात्रेसाठी वापरण्यात आलेल्या बस आणि कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पिंक कलरच्या बसेस आणि कार त्याचसोबत त्यावर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहे. 'दादांचा वादा लाभ आणि बळ', असे यावर लिहिण्यात आले आहे. सध्या या पिंक बसेसची सगळीकडे चर्चा सुरू आहे. नाशिकच्या दिंडोरीतून या जनसन्मान यात्रेची सुरूवात झाली. अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी बसमध्ये बाजूला बसून प्रवास केला. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जनतेशी संवाद साधणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT