Maharashtra Political News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: कोण कोणास म्हणालं?..! दिवसभरातल्या तडफदार प्रतिक्रियांमधून समजून घ्या आजच्या दिवसाचं राजकारण

Vishal Gangurde

Maharashtra Political News:

नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नांदेड मृत्यू प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकरावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नांदेड मृत्यू प्रकरणावरून राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

नांदेड मृत्यू प्रकरणावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

'नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शासकीय रुग्णालयात रुग्णांचे बळी जात आहेत. नांदेडमध्येच डीनवर कारवाई का झाली? ठाण्यामध्ये कारवाई का नाही झाली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला केला.

'रुग्णालयात बळी जात असताना मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नांदेडला का गेले नाहीत? एक फुल, एक हाफ दिल्लीत आहेत, दुसरा हाफ कुठे आहे? अशा शब्दात ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्र्यांच्या उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या एक फूल दोन हाफ या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'जे एक फूल एक हाफ आहेत यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

'तुम्ही कोरोना काळात मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं. अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर ज्यांनी सरकार चालवलं, ते उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नागपुरात का गेले नाहीत? नांदेडला का गेले नाहीत? असा सवाल करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीका केली.

'मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का? असाही सवाल बावनकुळेंनी केला.

विठ्ठलाने निवडणूक आयोगाला बुद्धी द्यावी, जयंत पाटील यांचे विठ्ठलाला साकडे

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या विषयाच्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी आज पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विठ्ठल चरणी साकडे घातले.

'भारतात पक्षाच्या चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढलंय. पक्षाची चोरी होऊ नये, यासाठी श्री विठ्ठलाने निवडणूक आयोगाला योग्य अशी बुद्धी द्यावी. एका पक्षाची चोरी झाली, दुसऱ्या पक्षाची चोरी होणार नाही. यासाठी आता विठ्ठलाची परीक्षा आहे, असं साकडं पाटील यांनी विठ्ठलाला घातलं.

राज्यात दोन मुख्यमंत्री आणि पाच उपमुख्यमंत्री असावेत - बच्चू कडू

पंढरपूर विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त पूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांना असतो. मात्र दोन भाऊ मुख्यमंत्री असल्याने पूजेवरून घोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात दोन नव्हे तर पाच उपमुख्यमंत्री असावेत. देवाला हे त्याचा आनंद होईल आणि हिंदू धर्मात पाच अंकाला चांगले महत्त्व आहे. तसेच दोन मुख्यमंत्री देखील असावेत, एक सार्वजनिक कामासाठी आणि एक व्यक्तिगत कामासाठी, अशी मिश्किल टिप्पणी बच्चू कडू यांनी केली आहे.

पालकमंत्री कोण? यापेक्षा जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा; मंत्री आदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण

'राज्यात सर्वत्र रायगडच्या पालकमंत्रिपदाची चर्चा सुरु आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांना विचारले असता पालकमंत्री कोण? या पेक्षा जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा आहे, असे उत्तर मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

'उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री आहेत. ते कोकणचेच आहेत. असं असताना मी पालकमंत्री होणार किंवा नाही, याला मी जास्त महत्व देत नाही. त्यापेक्षा जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याला अधिक महत्व देते, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

SCROLL FOR NEXT