Sanjay Raut News SAAM TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: …तेव्हा हे सगळे बिळात लपले होते; राम मंदिरावरून संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले, इतिहास आणि भाजप...

Sanjay Raut News: आम्ही लोणच्या एवढे नव्हतो तर मग आरोपी का केले यांना काही माहिती हे तेव्हा बिळात लपले होते, अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

येत्या २२ जानेवारी रोजी आयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त आयोध्येमध्ये जल्लोष आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. अशात राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे होताना दिसतायत. या सर्वांवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

भाजपचा इतिहासाशी काही संबंध नाही

देशाचा इतिहास घडवण्यामध्ये, मग तो देशाचा स्वातंत्र्यलढा असेल, मुंबईचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, आयोध्या आंदोलन असेल, देशातील कोणत्याही लढ्यात हे लोक नव्हते. त्यामुळे इतिहास आणि भाजपाचा अजिबात संबंध नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

भारतीय जनता पक्ष हा देखील 2014 नंतरच निर्माण झाला

मुळात यांचा जो देश आहे हे म्हणतात 2014 नंतर निर्माण झाला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष देखील 2014 नंतरच निर्माण झाला. मात्र आयोद्धेचा प्रश्न त्याआधीचा आहे. भाजपने पाहिलं पाहिजे त्यावेळी शिवसेना कुठे होती हे समजून घेतलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

बाबरी पाडण्याचं कृत्य शिवसैनिकांनी केल...

भाजपचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंग भंडारी यांनी तेव्हा केलेलं वक्तव्य बघा. "बाबरी पाडण्याचं कृत्य शिवसैनिकांनी केलं आहे", भाजपने केलेलं नाही हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंग भंडारी यांनी केलेलं वक्तव्य आहे. बाबरी मज्जिद प्रकरणात आमचेच खासदार आरोपी आहेत. आम्ही लोणच्या एवढे नव्हतो तर मग आरोपी का केले यांना काही माहिती हे तेव्हा बिळात लपले होते, अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

प्रकाश आंबेडकरांना आम्ही सांगते की...,

ज्या चर्चा आहेत त्या आम्ही वृत्तपत्रातून पाहतोय. आमचं असं म्हणणं आहे आणि ते सर्वांना माहीत आहे. प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा आम्ही त्यांना सांगतो जिंकेल त्याची जागा, हे आमचं सूत्र आहे. आमच्या आघाडीमध्ये जागेवरून ओढतान होणार नाही, जागांच वाटप जे आहे ते निवडून देण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावरती आमच्या तिन्ही पक्षाच एक मत आहे. या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत, असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT