Rohit Pawar Statement On NCP Symbol Saam TV
महाराष्ट्र

Rohit Pawar Statement On NCP Symbol: घड्याळावरुन रोहित पवारांचं सूचक विधान; म्हणाले, चिन्ह राहिलं नाही...

यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी म्हटलं की, "गेल्या काही वर्षात निवडणूक आयोगाने फक्त सत्तेतील लोकांची बाजू घेतली, असं सामान्य माणसांचं मत झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political News: घड्याळ चिन्ह कुणाकडे राहणार अजित पवारांकडे की शरद पवारांकडे असा प्रश्न राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांना देखील पडला आहे. यावरून आमदार रोहित पवारांनी एक मोठं आणि सूचक वक्तव्य केलंय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाप्रमाणे शरद पवारांच्या गटाला चिन्हापासून दूर केले जाईल, अशा आशयाचं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय. (Latest Marathi News)

शिवसेनेत दोन गट तयार झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार असे दोन गट येथे पडलेत. त्यामुळे खरी राष्ट्रवादी आणि घड्याळ कुणाचं असा प्रश्न उभा आहे. यावर अजित पवार गटाकडून पक्ष चिन्हावर दावा करत निवडणूक आयोगावर याचिका दाखल केलीये. काल (२७ जुलै) निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या गटाला या बाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी म्हटलं की, "गेल्या काही वर्षात निवडणूक आयोगाने फक्त सत्तेतील लोकांची बाजू घेतली, असं सामान्य माणसांचं मत झालं आहे. निवडणूक आयोगाने बजावलेली नोटीस ही फक्त एक प्रक्रिया आहे. यात दोन्ही बाजुचे गट ताकद लावत युक्तीवाद करतील."

"परंतु, निवडणूक आयोग (Election Commission) काय निर्णय देईल, याचा अंदाज सर्वांना देखील आला आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढू. जर येत्या काळात लढत असताना चिन्ह राहिलं नाही तर लोकांनाच विचारावे लागेल की, शरद पवार यांना कोणतं चिन्ह मिळायला हवं. त्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार, असा अंदाज आहे." नोटीस आल्यानंतर काल विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी असं म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT