Maharashtra Politics: शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वात मोठी अपडेट; राहुल नार्वेकरांनी दिली महत्वाची माहिती

rahul narvekar news: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लवकरच शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय द्यावा लागणार आहे
Rahul Narvekar
Rahul NarvekarSaam Tv
Published On

mumbai News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ३१ जुलैपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे नार्वेकरांना लवकरच शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय द्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर संविधानातील तरतुदींचे पालन करूनच योग्य निर्णय घेणार, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. (Latest Marathi News)

विधानसभा अध्यक्षांकडे सर्व अधिकार असताना शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप ठाकरे गटाचा होता. त्यामुळे ठाकरे गटाने कोर्टात याचिका दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने उत्तर देण्यास अध्यक्षांकडे ३१ जुलैपर्यंत मुदत दिल्याची माहिती विधीमंडळ विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Rahul Narvekar
Schools Closed Tomorrow in Thane : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर विधीमंडळाकडून कायदेशीर सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संविधानातील तरतुदींचे पालन करूनच योग्य निर्णय घेणार अशी माहिती दिली आहे.

Rahul Narvekar
Mumbai Local Train Update: रेल्वे वाहतुकीला पावसाचा तडाखा, लोकल उशिराने; ठाणे स्टेशनवर तोबा गर्दी

ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका का दाखल केली होती?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सर्व अधिकार दिले गेले आहेत. मात्र, त्यांच्याकडून शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही कार्यवाही केली गेली नाही, असा आरोप करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com