Praniti Shinde Saam TV
महाराष्ट्र

Praniti Shinde: भाजपने सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला आहे...; आमदार प्रणिती शिंदेंचा घणाघात

भाजपाचा हा कुटील डाव मोडून काढण्यासाठी भाजपच्या या धोरणाविरोधात आंदोलन उभे केले आहे, असं प्रणिती शिंदे म्हणल्या.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political News:

खाजगी नोकर भरती करण्यासाठी भाजपने आरक्षण रद्द करण्याचा मोठा डाव आखला आहे. त्यासाठीच भाजपने मोठ्या सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकलाय, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरात केला. (Latest Marathi News)

भाजपने ठेकेदारी पध्दतीने नोकर भरती सुरू केली आहे. यामुळे उपेक्षित लोकांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षण रद्द करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. भाजपाचा हा कुटील डाव मोडून काढण्यासाठी भाजपच्या या धोरणाविरोधात आंदोलन उभे केले आहे, असं प्रणिती शिंदे म्हणल्या.

काँग्रेस पक्षाला जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडली जाईल. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पंढरपूर विधानसभेत आणि सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असे आमदार शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

आज आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी खासगी नोकर भरतीवरून भाजप सरकारवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT