Eknath Shinde-C. BAvankule Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News : 'एकनाथ शिंदे २०२४ पर्यंत मुख्यमंत्री...', चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

Chandrashekhar bavankule News : उद्धवजी सोन्याच्या चमच्यात बादामाचा ज्यूस पिऊन मोठे झाले. ते देवेंद्रजींची उंची गाठू शकत नाही म्हणून असं बोलत आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीनंतर अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सातत्याने होताना दिसते. मात्र स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांना अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा केला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनींही प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीमध्ये २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील. तोपर्यंत काहीच प्रश्न येत नाही. २०२४ नंतर पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार पुन्हा चर्चा करतली. २०२४च्या निकालानंतर आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल त्यानुसार पुढे जाऊ, असं बावनकुळे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे बावचळलेल्या मनस्थितीत

उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी म्हटलं की, देवेंद्रजींसारख्या अष्टपैलू नेतृत्त्वाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात मोठा आदर आहे. उद्धवजी सोन्याच्या चमच्यात बादामाचा ज्यूस पिऊन मोठे झाले. ते देवेंद्रजींची उंची गाठू शकत नाही म्हणून असं बोलत आहेत.

सरकार गेल्यामुळे ते विचित्र परिस्थितीत आले आहेत. उद्धव ठाकरेंचं रोज अध:पतन होत आहे. रोज लोक सोडून जात आहे. बावचळलेल्या मनस्थितीत ते आहेत, अशी टीका बानवकुळे यांनी केली. (Political News)

संजय राऊतांना विमान पाडायचं ठरवलं

अजित पवारांवरील सामनातील टीकेवर त्यांनी म्हटलं की, अजित पवार त्यांच्याकडे होते तेव्हा संजय राऊत त्यांचे कौतुक करायचे. आता टीका करतात. उद्धव ठाकरे यांनी विमान चालवायची जबाबदारी संजय राऊत यांना दिली आहे. तर पायलटने ठरवलं विमान पाडायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडकी बहीणचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

Weekly Horoscope: या राशींना मेहनतीचे चांगले फळ मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weight Loss: जिम न करता ३ महिन्यात करा वजन कमी रोज फॉलो करा ही ट्रिक

SCROLL FOR NEXT