Gunaratna Sadavarte And Aditya Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते निवडणुकीच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंना देणार तगडं आव्हान

Gunaratna Sadavarte And Aditya Thackeray: गुणरत्न सदावर्ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांना गुणरत्न सदावर्ते कडवं आव्हान देणार आहेत.

Priya More

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक असून त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. अशामध्ये आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गुणरत्न सदावर्ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना ते तगडी फाईट देणार आहेत.

नुकताच गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली. वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांना गुणरत्न सदावर्ते कडवं आव्हान देणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची वरळीत चर्चा सुरू असताना आता गुणरत्न सदावर्ते सुद्धा वरळीतून निवडणूक लढवणार असल्याने वरळीची लढत रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे.

'मी वरळीतून निवडणूक लढवणार आणि आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार.', असा निर्धार गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, 'गेल्या ५ वर्षांमध्ये वरळी मतदारसंघामधील सामान्य नागरिक त्रासून गेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्यने काहीच काम केले नाही. काही अभिनेत्रींच्या बाबतीत त्यांच्या जीवनयात्रा कशी संपली याच्याच चर्चा माध्यमांमध्ये आदित्यबाबतीत राहिल्या. त्याच्या व्यतिरिक्त आदित्यबद्दल काहीच चर्चा झाली नाही.'

'वरळीमधील सुज्ञ लोकांनी आणि सर्वजाती धर्माच्या लोकांनी ठरवले आहे की कायदेशीररित्या वरळीला उभं करणं गरजेचे आहे. वरळीचा विकास हा अधिकाधिक लोकांना प्रिय आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंनी काय केले. वीर जिजामाता नगरमधील माझ्या सामान्य नागरिकांना सांगितले की, माझ्या चेहऱ्याकडे बघून सह्या करा. बिल्डरच्या घश्यामध्ये ८ हजार कोटी रुपये घालण्याचे काम केले. आदित्य ठाकरेंना वरळीतील लोकं कंटाळले आहेत. महाविकास आघीडाला विरोध करण्यासाठी मी तिथून निवडणूक लढणार आहे. मी उद्धव ठाकरेंचा खरे-खोटेपणा दाखवून दिला. वरळीमधील लोकांची इच्छा आहे की मी निवडणूक लढावी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT