Ajit Pawar Group On Sharad Pawar Meeting SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत नवा ट्वीस्ट! अजित पवार गटाचे सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra Monsoon Session 2023: आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Politics News: आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. शिवसेनेनंंतर राष्ट्रवादीतही बंड झाल्याने हे अधिवेशन चांगलीच वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.

काल शरद पवारांची अचानक भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाचे सगळे आमदार आणि मंत्री पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेणार आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही भेट होणार आहे. (Maharashtra Political Crisis)

याबाबत अधिक माहिती अशी की, कालच अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत सरकारमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला गेले होते. अजित पवार यांच्यासह गेलेल्या या सर्व मंत्र्यांनी आम्ही शरद पवारांचा आशिर्वाद घ्यायला गेल्याचे सांगितले होते. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी सर्व बंडखोर मंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले होते.

त्यानंतर आज पुन्हा अजित पवार गटाचे सर्व आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. मंत्र्यांच्या भेटीनंतर अजित पवार गटाच्या सर्व आमदारांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या भेटीत नेमकं काय होणार याचीच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, आजच्या अधिवेशनालाही राष्ट्रवादीच्या (NCP) अनेक आमदारांनी दांडी मारल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एकूण आमदार ५३ आहेत. यातील नवाब मलिक तुरुंगात असल्यामुळे सध्या ५२ आमदार उपलब्ध आहेत. त्यापैकी अजित पवार गटाचे १५ उपस्थित होते, तर शरद पवार गटाचे ९ आमदार सभागृहात उपस्थित होते. राष्ट्रवादीचे एकूण २८ आमदार अनुपस्थित राहिले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT