BIG POLITICAL TWIST IN MAHARASHTRA: EKNATH SHINDE MEETS AMIT SHAH FOR 50 MINUTES saamtv
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात 'कुछ तो बडा होने वाला है'; अमित शहांसोबत एकनाथ शिंदेंची ५० मिनिटे चर्चा

Eknath Shinde Meet Amit Shah: महायुतीमधील वाढत्या तणावादरम्यान एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. दिल्लीमध्ये दोन्ही नेत्यांची ५० मिनिटे बैठक झाली. शिंदे यांनी भाजपच्या वर्तनाबद्दल, निधी वाटपाच्या मुद्द्यांवर आणि निवडणूक रणनीतींबद्दल तक्रार केली आहे.

Bharat Jadhav

  • दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली.

  • एकनाथ शिंदेंनी निवडणूक राजकारण, निधी वाटप आणि भाजपच्या हालचालींबाबत तक्रारी केल्या.

  • आगामी निवडणुकांपूर्वी राज्यात मोठा राजकीय बदल होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) काहीतरी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज नाराज एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ५० मिनिटे चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील कृष्णमेनन मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीत शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या समोर तक्रारींचा पाढा वाचला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत (Local Body Elections) शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे,अशी तक्रार एकनाथ शिंदेंनी शहांकडे केलीय.

महाराष्ट्रातील राजकारणात काहीतरी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आज नाराज एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ५० मिनिटे चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील कृष्णमेनन मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली.

बैठकीत शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या समोर तक्रारींचा पाढा वाचला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे,अशी तक्रार एकनाथ शिंदेंनी शहांकडे केलीय.

त्यावरून बैठकीत उपस्थित असलेल्या काही शिवसेना नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारलं. इतकं सारं नाराजी नाट्य घडल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली. एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शिंदेंनी भाजपच्या नेत्यांची तक्रार केली.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघात भाजपने शिवसेना नेत्यांचे प्रवेश केल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचं एकमताने ठरलं होतं. मात्र राज्यातील भाजपने ऐनवेळी वेगळी चूल मांडत सेनेचीच कोंडी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजप नेत्यांविरोधात तक्रार केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत वादाचा खडा पडला आहे. त्यांनी मविआतील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देत त्यांची ताकद वाढली आहे, अशी तक्रार एकनाथ शिंदेंनी केली आहे. महायुतीमध्ये युती धर्म पाळावा, असे ठरले होते.

मात्र स्थानिक पातळीवर युती धर्म पाळला जात नाहीये. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय, ही बाब शिंदेंनी शहांच्या लक्षात आणून दिली. मित्र पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, आमदार फोडायचे नाहीत, असा अलिखित नियम पाळला जात नसल्याचे देखील शिंदेंनी शहांना सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT