Ajit Pawar Group On Sharad Pawar Meeting SAAM TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News: "वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल.." भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले...

Sharad Pawar Yeola Sabha: राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिकच्या येवल्यामध्ये पहिली सभा घेतली.

अभिजीत सोनावणे

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिकच्या येवल्यामध्ये पहिली सभा घेतली. या सभेत त्यांनी बंड करणाऱ्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

तसेच अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत टीका केली होती. त्यांच्या या टीकेलाही शरद पवार यांनी येवल्याच्या सभेतून चोख प्रत्यूत्तर दिले. यावेळी त्यांनी वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल.. असा थेट इशारा त्यांनी दिला. (Maharashtra Politics)

काय म्हणाले शरद पवार...

"काही लोक म्हणतात माझे वय झाले. वय झाले हे खरं आहे. वय ८२ झाले. पण गडी काय आहे तु पाहीलं कुठं? उगाच वयाच्या उल्लेख करु नका. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल; " असा खणखणीत इशारा त्यांनी यावेळी दिला. "पुन्हा असा विचार करु नका, धोरणात्मक टीका करु नका. कार्यक्रमावर टीका करा. पण वैयक्तिक टीका करु नका. ह्या गोष्टी आम्हाला कोणी शिकवले नाही; असेही ते पुढे बोलताना म्हणाले.

सभेत मागितली माफी...

यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिककरांची माफी मागायची असल्याचे मोठे विधान केले. मी इथे कोणावर टीका करण्यासाठी किंवा कोणाचे कौतुक करण्यासाठी आलो नाही.. तर मी जनतेची माफी मागायला आलोय असे ते यावेळी म्हणाले. माझा अंदाज कधीच चुकत नाही, मात्र यावेळी माझा अंदाज चुकला. या चुकीमुळे तुम्हाला त्रास झाला पण मी अशी चूक पुन्हा करणार नाही;" असे पवार यावेळी म्हणाले. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT