Sanjay Raut Reaction On Ashok Chavan Resign Saamtv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: काँग्रेसवर दावा सांगून 'हात' मिळवणार का? अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचा खोचक प्रहार!

Sanjay Raut Reaction On Ashok Chavan Resign: अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Political Crisis:

महाराष्ट्राच्य राजकारणात सर्वात मोठ्या घडामोडी सध्या घडत आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणालेत संजय राऊत?

"अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते. आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? तसेच निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला आहे. तसेच आपल्या देशात काहीही घडू शकते," असेही राऊत म्हणालेत.

अशोक चव्हाणांसोबत ६ आमदार जाणार?

काँग्रेसचे (Congress) तब्बल ६ आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत आहेत. या आमदारांसह अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे. या यादीमध्ये हदगाव हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर, तसेच विश्वजित कदम आणि अमित झनक यांच्या नावाची चर्चा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कधी होणार पक्षप्रवेश?

अशोक चव्हाण यांचा १५ फेब्रुवारीला पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. केंद्रिय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल, असेही बोलले जात आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांना भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अशोक चव्हाण यांना मंत्रीपद की राज्यसभा उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT