Pankaja Munde Dhananjay Munde Saamtv
महाराष्ट्र

Beed Political News: अजित पवारांच्या बंडानंतर मुंडे- बहीण भावातील संघर्षाचं काय? धनुभाऊंच्या एन्ट्रीने बीड जिल्ह्यात नवा पेच...

विनोद जिरे

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. आत्तापर्यंत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले नेते आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने अनेक ठिकाणी मोठा पेच निर्माण झाला आहे.

यामध्ये बीड जिल्ह्यातील मुंडे- बहिण भावातील संघर्ष वाटाघाटीने मिटणार की पंकजा मुंडे स्वतंत्र निर्णय घेणार याबाबत आता उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. जाणून घेवूया या विषयीचा सविस्तर रिपोर्ट... (Maharashtra Political News)

राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या बहिण भावातील संघर्ष राज्याला माहित आहे. 2019 च्या पराभवानंतर पंकजा मुंडे 2024 तयारी करताना त्यांनी रणसिंग फुंकले आहे.

मात्र राज्याचा राजकारणात राष्ट्रवादीने (NCP) शिंदे फडणीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र पेच निर्माण झाला आहे. यातच पंकजा मुंडे आणि भाजप पक्षश्रेष्ठीमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याने, नेमकं पंकजा मुंडेंच्या राजकारणाची भूमिका या सर्व घडामोडी मध्ये महत्त्वाची ठरणार आहे.

धनंजय मुंडे विधानसभा सोडणार..

बीडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप प्रमुख विरोधक आहेत. त्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये नेमकी लढत कुणाशी करायची आणि तयारी कोणी करायची ? यावरून पेच निर्माण झाला असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संपादक बालाजी मालगुडे यांनी सांगितले. भाजपा लोकसभेला पंकजा मुंडेंना उमेदवारी देऊन विधानसभा धनंजय मुंडेसाठी सोडतील असा अंदाजही व्यक्त केला आहे.

सत्ता संघर्ष कायम राहणार...

तसेच बीडमधील पत्रकार आणि राजकिय जाणकारांच्या मते येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मधील सत्ता संघर्ष कायम राहील. तसेच सभा निवडणुकीत फायदा झाला तरी विधानसभेसाठी मोठा पेच निर्माण होत असल्याची स्थिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT