ashok chavan Saam TV
महाराष्ट्र

Ashok Chavan: अशोक चव्हाणांना कोणतं मंत्रिपद मिळणार? ११ आमदारही काँग्रेसला रामराम ठोकणार?

Maharashtra Political Crisis: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसला राज्यात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Gangappa Pujari

Ashok Chavan Resign:

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसला राज्यात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण यांच्यासह पक्षातील अनेक आमदारदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. आगमी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

अशोक चव्हाण ११ आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे तब्बल ११ आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत आहेत. या ११ आमदारांसह अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधीमंडळ सूत्रांच्या माहितीनुसार, पुढच्या तासाभरात अशोक चव्हाण राजीनामा देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण आमदारकी सोडतील असं मानलं जात आहे. पक्ष आणि आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुपारी दोन वाजता यासंबंधीचे पुर्ण चित्र स्पष्ट होईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशोक चव्हाणांना कोणती ऑफर?

अशोक चव्हाण यांना भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अशोक चव्हाण यांना मंत्रीपद की राज्यसभा उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महायुतीकडून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण हे चौथा उमेदवार असतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यास हा काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का असेल. चव्हाणांना उमेदवारी देऊन भाजप महाविकास आघाडीत फाटाफूट करण्याचा डाव महायुतीचा असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी; ताटात वाढताच सगळेच ताव मारतील

Sanjay Raut: संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, शिंदेसेनेच्या खासदाराच्या दाव्याने खळबळ

Uric Acid : युरिक ॲसिड झपाट्याने वाढवतात 'या' डाळी; हाय बीपी, किडनी स्टोनच्या रुग्णांनी वेळीच व्हा सावध!

Gold Rate : सुवर्ण बाजारात अचानक खळबळ! सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले; १० दिवसांत अशा बदलल्या किमती

Pregnancy diet: गर्भवती महिलांसाठी श्रावणातील आहार ठरतोय महत्त्वाचा; मांसाहार टाळताना प्रोटीनची कमतरता होऊ नये म्हणून काय खावं?

SCROLL FOR NEXT