Narhari Zirwal On Maharashtra Political Crisis Saam Tv
महाराष्ट्र

Narhari Zirwal On Maharashtra Political Crisis : '...तर ते १६ आमदार अपात्र होतील', नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य

Narhari Zirwal On Shinde Group Mla : '...तर ते १६ आमदार अपात्र होतील', नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य

Satish Kengar

Narhari Zirwal On Shinde Group Mla : राज्यातील सत्तासंघर्षावर १४ मे आधी सुप्रीम कोर्ट आपला निकाल देऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

शिंदेंच्या १६ आमदारांना अपात्र ठरवलं होतं. घटनापीठाने हे प्रकरण माझ्याकडे सोपवल्यास १६ आमदार अपात्र होतील, असं नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.

Narhari Zirwal On Shinde Group Mla : काय म्हणाले नरहरी झिरवळ?

१६ आमदारांचं प्रकरण तुमच्याकडे आले तर काय होणार, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. यावर ते म्हणाले की, ''मी त्यांना इथून अपात्र म्हणून पाठवलं आहे. माझ्याकडे हे प्रकरण आलं तर ते अपात्र होती.'' (Breaking Marathi News)

Sharad Pawar On Supreme Court Result : शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील का? शरद पवार म्हणाले...

सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर बोलताना ते सांगता येणार नाही, निकाल आल्यावरच कळेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली होती. घटनापीठाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. आता हा निकाल कधी लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. निकाल लवकरच लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची धाकधूक वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT