Pandharpur News  Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Breaking : पंढरपुरात व्यावसायिकाची आत्महत्या; खासगी सावकाराला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

Pandharpur : पंढरपूरातील दिनेश फूटवेअर दुकानाचे मालक सुरेश कांबळे यांनी कर्जबाजारीपणा आणि खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • पंढरपूरातील व्यावसायिक सुरेश कांबळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • कर्जबाजारीपणा आणि खासगी सावकारांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद.

  • सात जणांविरोधात सावकारी प्रतिबंधक कायदा आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.

  • घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण, परिसरात हळहळ.

पंढरपूरात कर्जबाजारीपणाचा आणि खासगी सावकारांच्या तगाद्याचा आणखी एक बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेश मारुती कांबळे या ४५ वर्षीय व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या व्यवसायिकाचं नाव सुरेश कांबळे असं आहे. त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी सावकाराकडून कर्ज घेतलं होत. कर्जाची आणि व्याजाची वाढती रक्कम बघता त्यांना हे कर्ज पेलवत नव्हतं.आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून सुरेश यांनी कर्जाच्या त्रासाला तसेच ७ खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचं म्हटलं. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

सुरेश कांबळे हे पंढरपूर शहरात "दिनेश फूटवेअर" नावाचे चप्पल विक्रीचे दुकान चालवत होते आणि त्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायात मंदीचे वातावरण होते, विक्री घटली होती आणि उत्पन्नात मोठी घट झाल्याने ते गंभीर आर्थिक अडचणीत सापडले होते. व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी आणि दुकानाचे व्यवहार चालू ठेवण्यासाठी त्यांनी काही खासगी सावकारांकडून सहा टक्के मासिक व्याजदराने कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते आणि व्याजाची रक्कम फेडण्यासाठी ते वारंवार फिरवा फिरवी करत होते, मात्र अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत गेला. सावकारांकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण वसुलीच्या तगाद्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळले होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मानसिक तणाव अधिकच वाढला होता. अखेर वाखरी येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर पोलिसांनी त्यांच्या खिशातून एक चिठ्ठी हस्तगत केली. या चिठ्ठीत त्यांनी स्पष्टपणे लिहिले होते की, ते कर्जबाजारीपणामुळे आणि खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेत आहेत. चिठ्ठीत त्यांनी सात जणांची नावे नमूद केली होती. भारत हिलाल, विकी अभंगराव, शिवाजी गाजरे, बंडू भोसले, काशी ज्वेलर्सचे बापू गायकवाड, संजय व्यवहारे आणि इरफान हे त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचेही नमूद केले होते

या घटनेनंतर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित सात जणांविरुद्ध खासगी सावकरी प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश कांबळे यांच्या पत्नी शकुंतला कांबळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पंढरपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनीही खासगी सावकारांच्या जाचाला आळा बसावा आणि कर्जबाजारी लोकांना मदतीचा हात मिळावा, अशी मागणी केली आहे. आर्थिक अडचणींमुळे होणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांनी व्यापारी वर्गात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

50 टक्के टॅरिफ वादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्र्म्प् यांची पहिल्यांदाच भेट|VIDEO

Indian Flag History: तिरंग्याच्या इतिहासात दडलेली १० महत्त्वाचे तथ्य तुम्हाला माहित आहे का?

Mumbai Vada Pav: मुंबईत वडापाव विकणाऱ्या ताईचा नादखुळा, ५ भाषा खडाखड बोलते, सोशल मीडियावर एकच चर्चा

Tulja Bhawani Temple : गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द; शिखराबाबत लवकरच निर्णय

Congress setback : काँग्रेसला आणखी एक धक्का, ठाकरे भाजपच्या संपर्कात, विदर्भाचे राजकारण फिरणार!

SCROLL FOR NEXT