Corona News Update  Saam TV
महाराष्ट्र

Corona News: टेन्शन वाढलं! छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ दिवसात कोरोनाच्या 56 रुग्णांची नोंद; मास्क वापरण्याचे आवाहन

Covid 19 Cases In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Maharashtra Corona Update: गेल्या काही दिवासांपासून राज्यभरात कोरोना (COVID) बाधितांची संख्या कमी झाल्याने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. कारण गेल्या आठवडाभरात 56 नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील 36 जण सध्या सक्रिय आहेत. तर कोरोनामुळे एका 65 वर्षीय महिलेचा शुक्रवारी मृत्यू (Death) झाला आहे. या बातमीने छत्रपती संभाजीनगरकरांचे टेन्शन चांगलेच वाढवले आहे. (Corona News Update)

गेल्या आठ दिवसात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महानगर पालिका आरोग्य विभागाकडे 56 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सध्या 36 रुग्ण शहरात सक्रिय आहेत. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमधील ओपीडीमध्ये रोज सर्दी, ताप, खोकल्याचे शेकडो रुग्ण येत आहेत. मात्र कोरोना चाचणी न झाल्यामुळे त्यांना नेमका कोणता आजार आहे, हे लक्षात येत नाही.

मात्र काही रुग्णांना सल्ला दिल्यानंतर ते कोरोना चाचणी करत आहेत. 18 मार्चला एकाच दिवसात तब्बल 17 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले, यानंतर मागील आठ दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंखेत प्रतिदिन वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने दिल्या सुचना...

शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर वापर करावा, घरी गेल्यानंतर हात साबणाने धुवावेत, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : 'बिग बॉस' फेम अभिनेता विकतोय LPG सिलिंडर? किंमत वाचून येईल चक्कर

Maharashtra Live News Update : अमरावती ठरले देशातील सर्वाधिक उष्ण शहर; 41.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

Gas Cylinder Clash : गॅस सिलेंडरवरुन हाणामारी आणि राडा, एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत गेला वाद

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या निधीत कपात; ९५०० कोटी कापले; नेत्यानं थेट आकडेवारीच दिली

घरगुती गॅसचा साठा, व्यावसायिकांवर छापा; सामच्या ऑपरेशन सिलेंडरनंतर प्रशासनाला जाग

SCROLL FOR NEXT