NCP MLA Sparks Controversy With Communal Remarks Ahead of Diwali Saam Tv
महाराष्ट्र

Sangram Jagtap: दिवाळीला हिंदूच्या दुकानातूनच खरेदी करा, दादांच्या आमदाराचा धर्मांध नारा

Ajit Pawar Issues Notice: दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात युपी-बिहारसारखं धार्मिक धृवीकरण सुरु झालंय.. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराने धार्मिक धृवीकरणाचा विषप्रयोग कसा सुरु केलाय? आणि त्यावरुन अजित पवारांनी नेमकी काय भूमिका घेतलीय?

Girish Nikam

ऐकलंत... दिवाळीला फक्त हिंदूंच्या दुकानातूनच खरेदी करा, असं आवाहन करणारे..... हे आहेत शाहु, फुले आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेचा वारसा सांगणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप... याच संग्राम जगतापांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धर्मनिरपेक्ष विचारधाराच धाब्यावर बसवलीय.. हिंदूंवर मशिदीतूनच हल्ले होतात, असं वादग्रस्त वक्तव्य करुन जगतापांनी थेट मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय...

तर संग्राम जगतापांनी केलेलं वक्तव्य देशाच्या फाळणीचा प्रकार असल्याचा हल्लाबोल समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमींनी केलंय..तर मत्स्य संवर्धन व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी आमदार संग्राम जगतापांची पाठराखण केलीय.. खरंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर संघ आणि भाजपच्या कट्टर विचारांशी कधीही जवळीक साधली नाही... एवढंच नाही तर अजित पवारांनी संघाच्या बौद्धिकाला आणि संघाच्या मुख्यालयाची पायरी न चढून पुरोगामी विचारधारेवर ठाम असल्याचा संदेश दिला... मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांनाही वारंवार समज देऊनही त्यांनी पुन्हा धार्मिक धृवीकरणाच्या विष प्रयोगाचं आवाहन केलंय.. त्यामुळे अजित पवारांनी संग्राम जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचं जाहीर केलंय..

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात धार्मिक धृवीकरणाचे प्रकार सुरु झालेत.. मात्र असाच प्रकार उत्तर प्रदेशात कावड यात्रेदरम्यान झाला होता.. कावड मार्गावर मुस्लीम व्यापाऱ्यांकडून खरेदी न करण्याचं आणि प्रत्येक दुकानावर दुकानदाराचं नाव लिहीणं योगी सरकारने बंधनकारक केलं होतं.. मात्र सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला जोरदार चपराक लावत हा देश धर्मनिरपेक्ष असल्याची आठवण करुन दिली... आता महाराष्ट्रात ऐन दिवाळीच्या आणि पालिका निवडणुकांच्या तोंडावर धार्मिक धृवीकरणाचा प्रकार केला जात असल्याने न्यायालय असा बेबंद नेत्यांना चाप लावण्यासाठी ठोस भुमिका घेणार का? याबरोबरच कारणे दाखवा नोटीशीनंतरही संग्राम जगताप अजित पवारांच्या सूचना ऐकणार की मुस्लिम विरोधी वक्तव्यांचं गुऱ्हाळ सुरुच ठेवणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT