Maharashtra NCP Crisis saam tv
महाराष्ट्र

Maharashtra NCP Crisis: आताची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या 44 आमदारांचं अजित पवारांना समर्थनाचं प्रतिज्ञापत्र

44 NCP MLAs In Support of Ajit Pawar: राष्ट्रवादीत पक्षात दोन गट पडल्यानतंर अजित दादा आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाला जास्त आमदारांच समर्थन आहे? या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar vs Ajit Pawar : राज्याच्या राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीत पक्षात दोन गट पडल्यानतंर अजित दादा आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाला जास्त आमदारांच समर्थन आहे? या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं आहे.

राष्ट्रवादीच्या 44 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये 42 आमदार हे विधानसभेचे आहेत, तर 2 आमदार विधान परिषदेचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शिवसेनेप्रमाणेच पक्षांतर्गत संघर्ष सुरू होणार का हे पाहावं लागणार आहे. (Tajya Marathi Batmya)

दरम्यान राष्ट्रवादीतील अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून आज मुंबईत पक्षातील आमदार, खासदारांसह नेत्यांच्या बैठका बोलवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच राष्ट्रवादीमधील बहुसंख्य आमदारांचं समर्थन कुणाला याचा फैसला होणार आहे. या बैठकांसाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्रते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. (Latest Political News)

अजित पवार गटाची बैठक 11 वाजता होणार आहे, तर शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दुपारी १ वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. आजच्या बैठकीसाठी दोन्ही गटाने बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला तर अजित पवार यांच्याकडून अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT